esakal | Rain Updates: औरंगाबाद जिल्ह्यातील काही भागांत पाऊस

बोलून बातमी शोधा

शिवना (ता. सिल्लोड, जि.औरंगाबाद): जोरदार पावसामुळे शेतांतील ट्रॅक्टरद्वारे मशागतीचे थांबलेले काम.

Rain Updates: औरंगाबाद जिल्ह्यातील काही भागांत पाऊस

sakal_logo
By
टीम ई सकाळ

औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी (ता.दोन) वैजापूर तालुक्यातील शिऊर परिसर, लोणी खुर्दमध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. खुलताबादेतील टाकळी राजेराय, भगतवाडी, ममनापूर, भडजी हलक्या सरी, तर वेरुळ परिसरात वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. कन्नडमधील हतनूर, नागापूरात जोरदार, तर पीरबावड्यात मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळल्या.

हेही वाचा: औरंगाबादेत १ हजारांवर कोरोनाबाधित, १ लाख ११ हजार १४५ कोरोनामुक्त

शिवना परिसरात दुसऱ्या दिवशी पाऊस

शिवना (ता. सिल्लोड) परिसरात शनिवारी (ता. एक) संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह झालेल्या धुवाँधार पावसानंतर सलग दुसऱ्या दिवशी रविवारी (ता.दोन) दुपारी तीनला पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली. शनिवारी पावसाचा जोर एवढा होता की यात असलेल्या वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. एक-दोन ठिकाणी वीजही कोसळली. नांगरणी केलेल्या शेतांमध्ये पाणी साचले. शेतकऱ्यांनी पूर्वहंगामी लागवड केलेल्या उन्हाळी मिरचीचे पीक आडवे झाले. ठिबक सिंचन, मल्चिंग पेपर वाऱ्याने जमा होऊन बांधावर फेकले गेले. शेतकऱ्यांनी रब्बीत घेतलेले ज्वारी, मकाचे पिक पावसात भिजले. एकूणच शेतकऱ्यांसाठी नुकसानदायक ठरलेला हा पाऊस कधी पिच्छा सोडतो असे झाले आहे. आजचा पाऊस सलग दीड तास सुरु होता. सध्या शेतात पेरणीपूर्व उन्हाळी मशागतीची कामे सुरु आहेत. पावसामुळे अनेक ठिकाणी फसलेली ट्रॅक्टरसारखी वाहने शेतातच ठेवावी लागली.