Aurangabad : औरंगाबादच्या एकाला ओमिक्राॅनची बाधा,आरोग्य यंत्रणा सतर्क

मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याला ओमिक्राॅनची बाधा झाल्याचे समोर आले आहे.
omicron
omicronomicron
Updated on

औरंगाबाद : कोरोनाच्या ओमिक्राॅन व्हेरिएंटमुळे जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. औरंगाबादेतील एकाला ओमिक्राॅनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सदरील व्यक्ती परदेशातून आला आहे. मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याला ओमिक्राॅनची बाधा झाल्याचे समोर आले आहे. सध्या रुग्णाला मुंबईतच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. राज्यात रविवारी (ता.१९) सहा नवीन ओमिक्राॅनच्या (Omicron) रुग्णांची भर पडली असून त्यात औरंगाबादेतील (Aurangabad) एकाचा समावेश आहे. सदरील रुग्ण मुंबईतील (Mumbai) सेव्हन हिल रुग्णालयात विलगीकरणात (Omicron In Aurangabad) असल्याचे आरोग्य विभागाच्या एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमाच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली गेली आहे. (Aurangabad Resident Infected Omicron Variant In Mumbai)

omicron
आमदार सोळंके संतापले! म्हणाले, मुंडेंना पुन्हा एकदा जेलमध्ये घालणार

हा रुग्ण इंग्लंडचा प्रवास करुन आल्याचे कळते. याबाबत औरंगाबादेतील आरोग्य विभागाला कळताच त्यांनी रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा सुरु केला. रुग्ण कोणत्या भागातील रहिवासी आहे, याचा शोध घेऊन त्याच्या नातेवाईकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. ओमिक्राॅनमुळे यंत्रणा सतर्क झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar
Sandu Tukaram Karhale Freedom Fighter Death
Chhatrapati Sambhajinagar
Marathi News Esakal
www.esakal.com