सातारा जिल्ह्यात Omicron चा शिरकाव; फलटण तालुक्यात आढळले तीन रुग्ण I Omicron Virus | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Omicron Virus

फलटणात गत महिन्यात 28 जण परदेशातून आले असून त्यामध्ये 12 जण ग्रामीणमध्ये, तर 16 जण शहरात आले आहेत.

सातारा जिल्ह्यात Omicron चा शिरकाव; फलटण तालुक्यात आढळले तीन रुग्ण

फलटण शहर (सातारा) : आफ्रिका खंडातील युगांडाहून (Uganda) फलटण (Phaltan) शहरात परतलेल्या पती, पत्नी व दोन मुलांपैकी तीन जणांचे ओमिक्रॉनचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सातारा जिल्ह्यात ओमिक्रॉनने (Omicron Virus) प्रवेश केल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर माहिती मिळताच येथील शासकीय यंत्रणा अलर्ट झाली असून आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी सुरु झाली आहे.

फलटणमध्ये गत महिन्यात २८ जण परदेशातून आले असून त्यामध्ये १२ जण ग्रामीणमध्ये तर १६ जण शहरात आले आहेत. आफ्रिका (Africa) खंडातील युगांडाहून फलटण शहरात आलेल्या पती, पत्नी व त्यांची दोन मुले यांची खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. फलटण शहरातील मध्यवर्ती भागातील दाट लोकवस्तीच्या भागातच परदेशातुन आलेले कोरोना बाधित कुटूंब आढळून आल्याने प्रशासनाने उपाययोजना सुरु केल्या होत्या. सदर कुटूंबाची युगांडा येथील विमानतळावर (Uganda Airport) केलेली चाचणी निगेटिव्ह आली होती. परंतू भारतात आल्यानंतर या कुटूंबीयांची कोरोना चाचणी येथील विमानतळावर घेण्यात आली की नाही याबाबतची स्पष्ट माहिती समजू शकली नव्हती. दि. ९ डिसेंबर रोजी रात्री सदर कुटुंब फलटण येथे आले होते. याबाबत माहिती प्रशासनास मिळताच त्यांची चाचणी घेण्यात आली होती. ती पॉझिटिव्ह आली.

हेही वाचा: TET परीक्षेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार! आयुक्त सुपेंनी लाटले 1.70 कोटी

यानंतर संबंधित कुटुंबीयांचे पुन्हा स्वॅब घेण्यात येवून ते सातारा येथे पाठविण्यात आले होते, तेथेही ते पॉझिटिव्ह आल्याने ते ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या तपासणीसाठी ते पुणे येथे पाठविण्यात आले होते. सदर कुटुंबीय शहरातील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. परंतु आता त्यातील तिघांचे ओमिक्रॉनचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने फलटणकरांच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट पसरले असून जर या संसर्गाला पायबंद घालायचा असेल, तर सर्वांनी कोरोना संसर्ग फैलावू नये यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे कसोशीने पालन करावे, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. प्रशासकीय पातळीवर आवश्यक त्या उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे.

हेही वाचा: भाजपसोबत युती करताच कॅप्टनचा काँग्रेसला झटका

दरम्यान सदर कुटूंबातील पती, पत्नी, मुलगी व मुलगा यांपैकी मुलगासोडून अन्य तिघे ओमिक्रॉन बाधीत आढळून आले आहेत. त्यामुळे ते सध्या जीथे दाखल आहेत. त्या उपजिल्हा रुग्णालयातील संबधित डॉक्टर व स्टाफ यांची रॅपिट टेस्ट करण्यात येणार आहे, आवश्यकता वाटल्यास आरटीपीसीआरही करण्यात येणार आहे. तसेच या कुटुंबातील एक जण ओमिक्रॉनबाधीत नसला तरी त्याला तो आहे हे गृहित धरुनच उपचार दिले जाणार आहेत. सद्यस्थितीत या कुटूंबातील कोणासही कुठलाहि त्रास व लक्षणे दिसून नसून ते सामान्यपणे वावरत आहेत ही दिलासादायक बाब आहे.

हेही वाचा: 'त्या' समाजकंटकांना त्वरित शोधून काढा : उदयनराजे

फलटण शहरात ओमिक्रॉनबाधीत सापडले असले तरी कुणीही घाबरुन जाऊ नये. शासकीय यंत्रणा अलर्ट असून आवश्यक उपाययोजना राबविल्या जात आहेत. कोरोनाचा संसर्ग फैलावू नये म्हणून शासनाने घालून दिलेले सर्व नियम व केलेले आवाहन नागरिकांनी तंतोतंत पाळावे. जर आपल्या घरात, परिसरात परदेशाहून कोणी आले तर त्याची माहिती शासकीय यंत्रणेस द्यावी.

-शिवाजीराव जगताप, प्रांत अधिकारी, फलटण

Web Title: Three Omicron Virus Patients Were Found In Phaltan City In Satara District

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :CoronavirusPhaltanUganda
go to top