
औरंगाबाद : शेंद्रा-बिडकीन कनेक्टिव्हिटीसाठी रस्ता गरजेचा
औरंगाबाद : राष्ट्रीय व राज्य महामार्गामुळे शहाराच्या विकासात भर पडत आहे. मात्र, डिएमआयसीतील शेंद्रा आणि बिडकीन यांची कनेक्टीव्हीटीसाठी शेंद्रा ते बिडकीन रस्ता होणे गरजेचे आहे. हा रस्ता झाल्यास नव्याने येणाऱ्या उद्योगांना मोठा फायदा होणार असल्याचे उद्योजक आणि बांधकाम व्यावसायिकांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या भारतमाला प्रकल्पा अंतर्गत या रस्त्याचा समावेश असतानाही या रस्त्याचे काम अद्यापही पूर्ण झालेला नाही. या प्रकल्पानुसार शेंद्रा-बिडकिन ते पुढे पुणे महामार्ग आणि सोलापूर-धुळ्यासाठी कसाबखेड्यापर्यंत कनेक्टीव्हिटी यातून मिळणार आहे. मात्र, या मार्ग होऊ शकला नाही.
२०२० मध्ये मसिआच्या झालेल्या एक्सोपच्या समारोपाच्या कार्यक्रमा वेळी आलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्याचा विषय रद्द करणार असल्याचे सांगितले होते. त्याऐवजी करमाड पोलिस ठाण्यापासून कचनेर मार्गे बिडकीन पर्यंत कनेक्टीव्हीटीचा वापर करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, उद्योगांच्या नागरिकांसाठी हा रस्ता पुरक नाही. हा रस्ता नसल्याने शेंद्र्यातील उद्योजकांना औरंगाबाद मार्गे वाळूज जावे लागत आहे. यामुळे वेळ, पैसा जास्तीचा खर्च करावा लागत असल्याची प्रतिक्रिया उद्योजकांनी दिली.
तर शहराचे चित्र बदलेल
शेंद्रा-बिडकीनमध्ये ‘ऑरिक सिटी’त उद्योगांना पूरक अशा सुविधा दिल्या आहेत. यात शेंद्रा ते बिडकीन आणि बिडकीन ते वाळूज अशा औद्योगिक वसाहतीला जोडणाऱ्या रस्त्याची गरज आहे. हे झाल्यास उद्योग येतील, रोजगार वाढतील. याच पद्धतीने शहराला चारही बाजूंनी जोडणारे सर्कल झाल्यास पुढील दहा वर्षांत शहराचे चित्र बदललेले असेल. अशी प्रतिक्रिया क्रेडाई औरंगाबादचे अध्यक्ष नितीन बगडीया यांनी दिली.
Web Title: Aurangabad Road Needed Shendra Bidkin Central Government Bharatmala Project
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..