
औरंगाबाद : ‘सकाळ’ प्रकाशनाकडून मोफत कार्यशाळा
औरंगाबाद - लिहिणाऱ्या प्रत्येक माणसाला आपलं लिखाण पुस्तकरूपात यावं असं वाटत असतं. पण त्यासाठी पुस्तक तयार होण्याची, प्रकाशनाची, वितरण आणि मार्केटिंगची प्रक्रिया ही प्रत्येकाला माहिती असेलच असं नाही. तर ज्या लोकांना ती प्रक्रिया जाणून घ्यायची आहे, पुस्तक प्रकाशनासंबंधी कुठलेही प्रश्न आहेत, त्या लोकांसाठी ‘सकाळ’ प्रकाशन एक कार्यशाळा आयोजित करत आहे.
या कार्यशाळेत पुस्तकनिर्मितीची प्रक्रिया उलगडून दाखवण्यात येणार असून, पुस्तक प्रकाशित झाल्यावर ते बाजारात विक्रीसाठी कसं उपलब्ध करायचं, प्रकाशनासंबंधी करार, आर्थिक बाबी, रॉयल्टी, कॉपीराइट, याबद्दलही सविस्तरपणे माहिती देण्यात येणार आहे. ही कार्यशाळा दैनिक ‘सकाळ’ कार्यालय, टाऊन सेंटर, अक्षयदीप फ्लाझाशेजारी, सिडको बसस्थानकाजवळ, जालना रोड, औरंगाबाद, मंगळवार दिनांक १२ जुलै २०२२ रोजी सायंकाळी ४:३० ते ६:३० होणार असून ‘सकाळ’ प्रकाशनाचे प्रमुख आशुतोष रामगीर यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. ही कार्यशाळा पूर्णपणे मोफत आहे, तरी पूर्वनोंदणी आवश्यक आहे.
‘सकाळ’ प्रकाशनाच्या माध्यमातून नवोदित लेखक, प्रस्थापित लेखक आणि इतर लिखाणाशी संबधित तज्ज्ञमंडळी यांचे लेखन प्रकाशित होत असते. आजवर ‘सकाळ’ने सहाशेहून अधिक पुस्तके प्रकाशित केली असून तीस लाखांपेक्षा जास्त पुस्तके जगभरात वितरित केली आहेत. ज्यांना पुस्तक निर्मितीची प्रक्रिया जाणून घ्यायचीय, ज्यांना स्वतःची पुस्तकं प्रकाशित करायचीत अशा लेखकांनी, वाचकांनी कार्यशाळेला आवर्जून उपस्थित राहण्याचे आव्हान करण्यात येत आहे.
कार्यशाळा पूर्वनोंदणीसाठी संपर्क :
९८८१५९८८१५ / ८८८८८४९०५०
(सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत संपर्क साधावा.)
Web Title: Aurangabad Sakal Publication Free Workshop Book Publication Distribution Marketing Process
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..