औरंगाबाद : युडायस माहितीचे काम ८८ टक्के पूर्ण

औरंगाबाद शहरातील काम अद्याप रखडलेले
 Eudis information work 88 percent complete
Eudis information work 88 percent complete sakal

औरंगाबाद : शालेय शिक्षण विभागाने जिल्ह्यातील सर्व शाळांना युडायसमध्ये माहिती भरण्याचे आदेश दिले आहेत. अनेक शिक्षक, मुख्याध्यापक उन्हाळ्याच्या सुट्टीवर आहे, असे असताना औरंगाबाद जिल्ह्याचे ८८.९७ टक्के काम पूर्ण झाले आहे.

युडायस प्लस प्रणाली ही केंद्र सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने विकसित केली आहे. समग्र शिक्षा या योजनेचे पुढील वर्षाचे वार्षिक नियोजन व अंदाजपत्रक तयार करण्याकरिता युडायस प्लस प्रणालीमार्फत माहिती मागवली जाते. यातील युडायस प्लस ऑनलाइन प्रणालीमध्ये राज्यातील सर्व शाळांची माहिती राज्य, जिल्हा, महानगरपालिका व तालुका तसेच शाळा स्तरावरून ऑनलाइन भरणे आवश्यक असते. आत्तापर्यंत दोनवेळा या कामासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता देखील सर्व शाळांना ऑनलाइन माहिती भरण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे. शुक्रवार अखेर औरंगाबाद जिल्ह्यात ८८.९७ टक्के शाळांनी युडायसवर शाळेची माहिती भरलेली आहे.

जिल्ह्यात ८८ टक्के काम

औरंगाबाद जिल्ह्यात शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, अंशतः अनुदानित, जि.प. अशा एकूण ४ हजार ६१६ शाळा आहे. त्यापैकी ४ हजार १०७ शाळांनी युडायसवर माहिती भरली आहे. ३१६ शाळांचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. तर १९३ शाळांनी अजून कोणतीही माहिती अपलोड केलेली नाही. केवळ फुलंब्री तालुक्याचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. औरंगाबाद शहरातील काम अद्याप रखडलेले आहेत.

युडायस प्लस माहिती

तालुका एकूण शाळा पूर्ण माहिती भरलेल्या शाळा

  • फुलंब्री ः २९५ २९५

  • कन्नड ः ४७० ४६९

  • पैठण ः ४२४ ४२२

  • वैजापूर ः ४४९ ४३७

  • खुलताबाद ः १९४ १८८

  • गंगापूर ः ५३१ ५०१

  • सिल्लोड ः ५१९ ४७८

  • सोयगाव ः १४४ १२७

  • औरंगाबाद ः ६०७ ४७२

  • युआरसी १ ः ४४६ ३३५

  • युआरसी २ ः ५३७ ३८३

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com