
औरंगाबाद : पालकांचे शाळेसमोर ठिय्या आंदोलन
औरंगाबाद : सिडको परिसरातील शांतीनिकेतन पब्लिक स्कूलमध्ये गेल्या ३-४ वर्षांपासून शाळेत आवश्यक शिक्षक नाहीत. संस्थाचालकांशी संपर्कही होत नाही. व्यवस्थापनाची शाळा चालवण्याची मानसिकता दिसत नाही. शाळा विद्यार्थ्यांची टीसीही देत नाही. आम्हाला न्याय द्या अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्राथमिक शिक्षण विभागाकडे तक्रार केली. तसेच शाळेसमोरही सोमवारी ठिय्या आंदोलनही केले.
शांतीनिकेतन पब्लिक स्कूल ही स्वयंअर्थसहाय्यीत पहिली ते दहावी पर्यंत शाळा आहे. शाळेने एन ७ येथील एका शाळेसोबत विद्यार्थ्यांच्या समायोजनाची बोलणी केली. मात्र, ती फिस्कटल्याने पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना एकाच वर्गात बसण्याची वेळ आली आहे. शाळेत दोनच शिक्षक आहेत, मुख्याध्यापक नाही. आरटीईतून प्रवेशित विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे पुढे काय असा प्रश्न पालकांनी केला आहे. शाळा विद्यार्थ्यांची टीसीही देत नाही. असे पालकांचे म्हणणे आहे. दहावीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा तर पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. व्यवस्थापन शाळा चालवण्यास असमर्थ असल्याने सहकार्य करण्याची विनंती २२ पालकांनी खाजगी शाळा विभागाचे प्रदिप राठोड यांना निवेदन दिले
Web Title: Aurangabad Shantiniketan Public School Parents Agitation
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..