औरंगाबाद : नेते गेले मात्र कार्यकर्त्यांचा पाया मजबूत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Shiv Sena District Chief Ambadas Danve

औरंगाबाद : नेते गेले मात्र कार्यकर्त्यांचा पाया मजबूत

औरंगाबाद : सद्याच्या राजकीय परिस्थितीत पदाधिकाऱ्यांच्या जागा कुठेच रिक्त नाहीत. ज्यांना ज्यांचे काम करायचे त्यांचे काम करावे मात्र पक्षात राहून दुहेरी भूमिकेत वावरू नये. त्यामुळे बंडखोरी करून नेते गेले असले तरी जनतेमध्ये मदत पोचवणारी यंत्रणा, शिवसैनिकांचा पाया मजबूत आहे. औरंगाबाद जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, हे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिकेच्या निवडणुकीत दिसेलच, असा दावा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जिल्ह्यातून दोन हजार शपथपत्रे सादर केली आहेत. तसेच २० हजार प्राथमिक सदस्य नवीन नोंदणी केली आहे. जिल्ह्यात एक लाखावर प्राथमिक सदस्य नोंदणी करण्याचे लक्ष्य असल्याचे श्री. दानवे यांनी सांगितले. वेगवेगळ्या पक्षातून शिवसेनेत येणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे, मात्र शिवसेनेचे प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये संधी दिली जाईल.

महाविकास आघाडीने लढायचे किंवा नाही हे पक्ष सांगेल त्याप्रमाणे केले जाईल मात्र गट, गणात आणि वॉर्डात लढण्याची आमची तयारी आहे, असेही त्यांनी नमूद केले.

आमदार सत्तार डरपोक : दानवे

पत्रकार परिषदेत एका प्रश्‍नाच्या उत्तरात आमदार श्री. दानवे म्हणाले, आमदर अब्दुल सत्तार हे डरपोक आहेत. नुसता त्यांच्या तोंडात दम आहे ते व्यावसायीक राजकारणी. गर्दी जमवण्याचे त्यांचे एक तंत्र आहे हे सर्व ठिक आहे मात्र त्यांच्या बंडखोरीचा शिवसेनेच्या मतांवर कसलाच परिणाम होणार नाही.

Web Title: Aurangabad Shiv Sena Leaders Workers Rebellion District Chief Ambadas Danve

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..