Aurangabad : वाहनांचे शोरूम फोडणारी टोळी अखेर पकडली

महाराष्ट्र, गुजरातमध्येही गुन्हे : चोरीच्या पैशांतून कुणी बांधले घर तर कुणी घेतल्या म्हशी!
Aurangabad showroom vehicle theft thief gang arrested police
Aurangabad showroom vehicle theft thief gang arrested police
Updated on

औरंगाबाद : पगारिया शोरूम फोडून चोरट्यांनी तब्बल १५ लाख ४३ हजार रुपये घेऊन पोबारा केल्याची घटना ४ ऑगस्टरोजी घडली होती. यामध्ये आठपैकी तीन चोरट्यांना पकडण्यात गुन्हे शाखेला अखेर सव्वा महिन्यानंतर यश आले. विशेष म्हणजे या दरोडेखोरांनी आजवर वापी, वलसाड (गुजरात), भुसावळ, जळगाव, औरंगाबाद आदी तब्बल १४ शोरूम फोडून रोकड लांबविल्याचे पोलिस तपासात समोर आले. सोनू नागूलाल मोहिते (वय २५), शिवा नागूलाल मोहिते (३२, रा. विचवा सुरवाडा, ता. बोदवड) या दोघा आरोपी सख्ख्या भावांसह अजय सीताराम चव्हाण (३२, रा. धानोरी सुरवाडा) असे अटकेतील तिसऱ्या साथीदाराचे नाव आहे.

टोळीचा म्होरक्या सोनू नागूलाल मोहितेसह तिघांना जळगाव जिल्ह्यातल्या धानुरा-वरणगाव या गावच्या मार्गावर बेड्या ठोकण्यात आल्या. इतर पाच जण परराज्यात पसार झाले असून अटकेतील आरोपींकडून रोख एक लाख रुपये आणि १९ ग्रॅम सोन्याचे दागिने असा ऐवज जप्त करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली.

सुरवातीला सीसीटीव्हीमधील महिला की तृतीयपंथी यावर तपास भरकटला होता. जवळपास ७५ तृतीयपंथी तपासल्यानंतरही सीसीटीव्हीतील फोटोशी साधर्म्य साधले गेले नसल्याने पुन्हा उपनिरीक्षक अजित दगडखैर, उपनिरीक्षक अमोल म्हस्के यांनी शोधास सुरवात केली. शहरासह पोलिसांनी जळगाव, गुजरात सीमेवरील गावातील गुन्हेगारांचा तपास करण्यास सुरवात केली होती.

गुजरातसह १४ ठिकाणी गुन्‍ह्यांचा पाऊस

सोनू मोहितेवर गुजरातसह इतर राज्यात २०१५ ते २०१९ दरम्यान तब्बल १४ गुन्हे दाखल आहेत. वापी, वलसाड येथे पाच, नशिराबाद जळगाव (२), एमआयडीसी जळगाव (३), वापी जीआयडीसी (३), बाजारपेठ भुसावळ (१) आदि ठिकाणी गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त डॉ़निखिल गुप्ता, सहायक आयुक्त विशाल ढुमे, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अजित दगडखैर, अमोल म्हस्के, सहायक फौजदार रमाकांत पटारे, सतीश जाधव, संजय राजपूत, नवनाथ खांडेकर, संदीप तायडे, संजय नंद, विठ्ठल सुरे, सुनील बेलकर, संदीप राशिनकर, नितीन देशमुख, काकासाहेब अधाने, अजय दहिवाळ, विजय घुगे, धनंजय सानप, संजीवनी शिंदे, पूनम पारधी, आरती कुसळे यांनी यशस्वी केली.

सर्वच एकमेकांचे जवळच्या नात्यात

सोनूच्या टोळीतील सर्वच साथीदार नात्यातील आहेत. दोघे सख्खे भाऊ, मामा-भाचा, साले-मेहुणे आहेत. अजय चव्हाण, शिवा मोहिते, जितू मंगलसिंग बेलदार (२४ रा.धानोरी), बादल हिरालाल जाधव (१९ रा. बाजारपट्टी), अभिषेक देवराम मोहिते (१९, रा. धानोरा), विशाल भाऊलाल जाधव (२२, बाजारपट्टी), करण गजेंदर बेलदार (२५ रा. दाभे पिंपरी) यांचा समावेश आहे.

आरोपींच्या शोधात पोलिसांनी वाटली खिचडी

तपासादरम्यान जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे एक टोळी सक्रिय असून ती केवळ शोरूमलाच ‘लक्ष्य’ करते अशी खात्रीशीर माहिती मिळाली. धानोरी-वरणगावच्या (ता. बोदवड) मार्गावरील एका पालावर आरोपी असण्याचा संशय आला. परंतु आरोपींना पकडणे आव्हान असल्याने उपनिरीक्षक दगडखैर, म्हस्के यांनी एका हॉटेलमधून खिचडी तयार करून घेतली आणि त्या पाल वस्तीवर मोफत वाटप केली. मात्र सीसीटीव्हीत दिसलेल्यांपैकी एकही आरोपी खिचडी घेण्यासाठी समोर आला नव्हता! नंतर पोलिस पहाटेच मॉर्निंग वॉकला निघाले.

धानोरी परिसरातील पाल वस्तीपासून वॉकिंग करत असताना टोळीचा म्होरक्या सोनू नागुलाल मोहिते हा बांगड्या विकण्यासाठी बाहेर पडला होता, संशयित म्हणून त्याला ताब्यात घेतले अन् चौकशीत पगारिया शोरूम फोडणाऱ्या गुन्ह्यातील तो म्होरक्या असल्याचे समोर आले. त्यापाठोपाठ अजय चव्हाण, शिवा मोहिते यांनाही ताब्यात घेतले. अटकेतील आणि फरार आरोपींनी चोरीच्या पैशांतून कोणी सोन्याची लगड केली तर कोणी नवी कोरी दुचाकी घेतली तर फरारींपैकी काहींनी घर बांधले असून, एकाने तर चोरीच्या पैशाने चक्क म्हशी विकत घेतल्याचेही समोर आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com