औरंगाबाद : निवृत्त तलाठ्याचा गळफास घेतलेला मृतदेह आढळला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sucide case

औरंगाबाद : निवृत्त तलाठ्याचा गळफास घेतलेला मृतदेह आढळला

औरंगाबाद : मध्यवर्ती बसस्थानकाशेजारील सिद्धार्थ उद्यानात असलेल्या मत्स्यालयाजवळ झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत निवृत्त तलाठ्याच्या मृतदेह आढळून आला. हा प्रकार ३ जुलै रोजी नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले.

बशीर शेख शहमद शेख (वय ५८, रा. शिंगीपिंप्री ता.गंगापूर. जि.औरंगाबाद) असे मृत तलाठ्याचे नाव असल्याचे क्रांतीचौक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. गणपत दराडे यांनी रविवारी सांगितले. विशेष म्हणजे अंगावर धारदार शस्त्राचे वार असून चाकूही बाजूलाच आढळल्याने खुनाचाही संशय व्यक्त करण्यात आला आहे. निवृत्त तलाठी शेख यांची बहीण औरंगाबादेत राहते. तिला भेटण्यासाठी ते शनिवारी औरंगाबादला आले होते. ते काही महिन्यापूर्वीच तलाठी पदावरून निवृत्त झाले होते. बहिणीकडे आलेले शेख शनिवारी रात्री औरंगाबादेतच थांबले. सकाळी ते बहिणीच्या घरून गावी जाण्यासाठी निघाले. परंतु गावी न जाता सकाळी ते सिद्धार्थ उद्यानात गेल्याचे समोर आले.

उद्यानातील मत्स्यालयाजवळील झुडपात त्यांचा मृतदेह आढळून आला. शरीरावर धारदार शस्त्राने अनेक वार होते. झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह उद्यानात फिरण्यासाठी आलेल्यांना दिसला. या घटनेची माहिती मिळाल्यावर क्रांतीचौक पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बशीर शेख यांचा मृतदेह खाली उतरवून घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हत्या की आत्महत्या

बशीर यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढलेल्या ठिकाणी पोलिसांना धारदार चाकूही आढळून आला आहे. सोबतच बशीर यांच्याकडे असणारी पिशवी सापडली असून त्यामध्ये त्यांची कार्यालयीन कागदपत्रे होती. कार्यालयात केलेले अर्ज देखील आढळून आले असून प्रथमदर्शनी हा आत्महत्येचा प्रकार असू शकतो अशी माहिती डॉ. दराडे यांनी दिली.

Web Title: Aurangabad Siddhartha Garden Sucide Case Death Body Found

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..