औरंगाबाद : इलेक्ट्रिक कार खरेदीसाठी मोडली दोनशे कोटींची एफडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Electric Car

औरंगाबाद : इलेक्ट्रिक कार खरेदीसाठी मोडली दोनशे कोटींची एफडी

औरंगाबाद : स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत सुरू करण्यात आलेली शहर बससेवा किमान दहा वर्षे अविरत चालू राहावी, यासाठी औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे तत्कालीन सीईओ डॉ. निपुण विनायक यांनी २०० कोटींची एफडी (फिक्स डिपॉझिट) केली होती. पण, ही एफडी पाच इलेक्ट्रिक कार खरेदीसाठी तोडण्यात आल्याचे समोर आले आहे. दोन कोटींची एक एफडी तोडून या कार खरेदी करण्यात आल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले.

स्मार्ट सिटी अभियानात सर्वात मोठा उपक्रम शहर वाहतुकीचा आहे. शहराची सार्वजनिक वाहतुकीची गरज लक्षात घेऊन स्मार्ट सिटी अभियानात तब्बल १०० बस खरेदी करण्यात आल्या आहेत. स्मार्ट सिटीचे तत्कालीन सीईओ तथा महापालिकेचे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी शहर बससाठी सुक्ष्मपद्धतीने नियोजन केले होते. सार्वजनिक वाहतुकीचा तोटा गृहीत धरून त्यांनी २०० कोटी रुपयांची एफडी केली होती. तसेच एसटी महामंडळासोबत सिटीबस चालविण्याचा करार केला होता.

पण, दीर्घ काळ चाललेल्या संपानंतर स्मार्ट सिटीने एसटी सोबतचा करार मोडला. तसेच आता २०० कोटींची एफडीही तोडण्यात आल्याचे समोर आले आहे. २०० कोटींच्या एफडी प्रत्येकी दोन कोटी याप्रमाणे होत्या. इलेक्ट्रीक कार खरेदीसाठी एक दोन कोटीची एफडी तोडण्यात आली आहे. हा निर्णय स्मार्ट सिटीचे तत्कालीन सिईओ आस्तिककुमार पांडेय यांनी घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पोलिस आयुक्तांना दिली एक कार

पाच पैकी एक इलेक्ट्रीक कार पोलिस आयुक्तांना देण्यात आली असल्याचे स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. स्‍मार्ट सिटीकडे असलेल्या चारपैकी एक कार स्मार्ट सिटीच्या सीईओसाठी असून, उर्वरित कार अधिकारी वापरतात, असे या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.

Web Title: Aurangabad Smart City 200 Crores Fixed Deposit Electric Car Purchase

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..