Aurangabad : ऑक्टोबरअखेर होणार २२ रस्ते

निधी स्मार्ट सिटीचा : प्रशासनाने दिली ३० ऑक्टोबरची डेडलाइन
Aurangabad Smart City 22 road works
Aurangabad Smart City 22 road workssakal

औरंगाबाद : स्मार्ट सिटीच्या निधीतून शहरात २२ ठिकाणी रस्त्यांची कामे केली जात आहेत. ही कामे पूर्ण करण्यासाठी स्मार्ट सिटी प्रशासनाने ३० ऑक्टोबरची मुदत दिली आहे. त्यामुळे दिवाळीनंतर शहरातील नागरिकांना २२ गुळगुळीत रस्ते मिळणार आहेत.

स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे शहरात ३१७ कोटी रुपये खर्च करून १०८ रस्त्यांची कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र निधीअभावी यातील फक्त २२ रस्त्यांची कामे पहिल्या टप्प्यात पूर्ण करण्याचे आदेश तत्कालीन सीईओ आस्तिककुमार पांडेय यांनी कंत्राटदाराला दिले. त्यानुसार मुंबई आयआयटीच्या देखरेखीखाली ए. जी. कन्स्ट्रक्शनमार्फत ही कामे सुरू आहेत. ही कामे पूर्ण करण्यासाठी ३० ऑक्टोबरपर्यंतची मुदत कंत्राटदाराला देण्यात आली आहे, बहुतांश रस्त्यांचे काम पूर्ण होत आले आहेत, असे नोडल अधिकारी इम्रान खान यांनी सांगितले. दरम्यान दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी अद्याप निधीची तरतूद झाली नसल्यामुळे अनिश्‍चितता कायम आहे.

या रस्त्यांचा आहे समावेश

  • देवगिरी बँक जळगाव रोड ते बजरंग चौक सिडको एन- ५

  • ओंकार गॅस एजन्सी सिडको एन-८ मार्गे वेणूताई चव्हाण स्कूल ते अनिकेत हॉस्पिटल

  • आविष्कार चौक ते भोला पान सेंटर सिडको

  • तापडिया पार्क ते पब्लिक स्कूल ते पुंडलिकनगर पोलिस स्टेशन ते महापालिका उद्यान पारिजातनगर

  • आंबेडकर पुतळा भगतसिंगनगर ते पिसादेवी रोड

  • रिलायन्स पेट्रोलपंप जळगाव रोड ते त्रिदेवता मंदिर मार्गे सिडको एन- ७ पोलिस स्टेशन

  • डॉ. कल्याण काळे यांचे घर ते लोकसेवा स्टेशनरी ते परिवर्तन गॅरेज, मथुरानगर सिडको एन- ६

  • छत्रपती शिवाजी कॉलेज ते उच्च न्यायालय पूर्व पश्चिम बाजू मार्गे ॲड. प्रवीण मंडलिक यांचे घर

  • प्रतानगर स्मशानभूमी ते उड्डाणपूल दोन पुलांसह स्मशानभूमीजवळ आणि देवानगरी अंतर्गत रस्ता

  • सौभाग्य चौक ते ताठे मंगल कार्यालय ते सिद्धार्थ चौक

  • जवाहर कॉलनी पोलिस स्टेशन ते सावरकर चौक गारखेडा

  • आकाशवाणी चौक ते त्रिमूर्ती चौक ते गजानन महाराज मंदिर

  • एकता चौक शहानूरमिया दर्गा ते प्रतापनगर ऑटोरिक्षा स्टॅण्ड पंजाब डेअरी

  • एमटीडीसी हॉलीडे कॅम्प ते अण्णा भाऊ साठे चौक मार्गे मिलिंदनगर, कबीरनगर

  • न्यू. भाग्योदयनगर उमरीकर लॉन ते लोटस पार्क सातारा परिसर

  • जवाहर कॉलनी पोलिस स्टेशन ते सावरकर चौक गारखेडा

  • पडेगाव ते पडेगाव स्लॉटर हाऊस

  • बाटा शूज ते एसबी कॉलेज गेट आणि गोली वडापाव ते एसबी कॉलेज गेट

  • जिंतूरकर हॉस्पिटल ते अदालत रोड आणि भाग्यनगरातील अंतर्गत रस्ता

  • माऊली मेडिकल स्टोअर ते भावसिंगपुरा सांची कमान

  • एसबीओ स्कूल ते अंबिकानगर, तुळजाभवानी चौक ते भगतसिंगनगर

  • दर्गा हजरत पीर साहेब पुतळा ते रेंगटीपुरा मार्गे चंपा चौक

  • गणपती मंदिर नागेश्वरवाडी ते एमजेपी कार्यालय आणि खनाळे हॉस्पिटल ते झांसी राणी चौक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com