औरंगाबाद : शहरात ६३५ कोटी रुपयांची कामे सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad smart city road development work start

औरंगाबाद : शहरात ६३५ कोटी रुपयांची कामे सुरू

औरंगाबाद : स्मार्ट सिटी अभियानाच्या अंतिम टप्प्यात औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने मार्चएण्डला अठरा कामांच्या ६३५ कोटींच्या निविदा अंतिम केल्या आहेत. ही कामे टप्प्या-टप्प्याने सुरू करण्यात आली असून, सर्वात मोठे काम म्हणजे ३१७ कोटींचे रस्ते आगामी नऊ महिन्यात होणार आहेत. स्मार्ट सिटी अभियानातील कामांच्या निविदा ३१ मार्चपर्यंत अंतिम करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले होते. त्यानुसार औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने १८ कामांच्या ६३५ कोटींच्या निविदा अंतिम केल्या.

दरम्यान, यातील बहुतांश कामे सुरु झाली आहेत. ३१७ कोटींच्या रस्त्यांचे सर्वात मोठे काम असून, तीन टप्प्यात १०८ रस्त्यांची कामे नऊ महिन्यात पूर्ण केली जाणार आहेत. त्याचबरोबर सफारी पार्कच्या दुसरा टप्पा, मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, संत तुकाराम नाट्यगृहाचे नूतनीकरण, स्मार्ट स्कूल, स्मार्ट हेल्थ, सीसीटिव्ही अद्ययावत करणे, अशा कामांचा यात समावेश आहे.

१३४ कोटींची जास्तीची कामे

स्मार्ट सिटी अभियान एक हजार कोटींचे होते. मात्र औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून ६१ कामांच्या १२२४ कोटींच्या निविदा काढण्यात आल्या. मात्र शेवटच्या टप्प्यातील १८ कामांसाठी काढण्यात आलेल्या निविदांमध्ये तब्बल नव्वद कोटींची बचत झाली. या निविदा अंदाजपत्रकापेक्षा कमी दराने आल्या होत्या. या बचतीमुळे ११३४ कोटी रुपयांचीच बिले स्मार्ट सिटीला द्यावी लागणार आहेत. त्यामुळे १३४ कोटींचा अधिकचा निधी उभारण्याचे आवाहन असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले होते.

Web Title: Aurangabad Smart City 635 Crore Road Development Work Start

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top