औरंगाबाद :अवघ्या दहा दिवसात निघाल्या १७ निविदा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Smart City campaign

औरंगाबाद :अवघ्या दहा दिवसात निघाल्या १७ निविदा

औरंगाबाद : स्मार्ट सिटी अभियानातील कामांच्या निविदा ३१ मार्चपर्यंत अंतिम करणे बंधनकारक आहे. त्यात महापालिकेचे १०० कोटींचे कर्ज मंजूर होताच निविदांचा धडाका सुरू करण्यात आला आहे. गेल्या दहा दिवसात विविध कामांच्या तब्बल १७ निविदा काढण्यात आल्या आहेत.

स्मार्ट सिटी अभियानामार्फत एक हजार कोटींच्या कामांचे नियोजन करण्यात आले आहे. त्या केंद्र शासन ५०० कोटी, राज्य शासन व महापालिकेचा प्रत्येकी २५० कोटी रुपयांचा वाटा आहे. केंद्र व राज्य शासनाने महापालिकेला निधी दिला पण महापालिकेने केवळ ८७ कोटी रुपयांचा स्वहिस्सा टाकला होता. त्यामुळे शासनाने महापालिकेने स्वहिस्सा टाकल्याशिवाय पुढील निधी मिळणार नाही, तसेच ३१ मार्चपर्यंत सर्व कामांच्या निविदा अंतिम करण्याची अट टाकली होती. त्यामुळे महापालिकेने कर्ज घेऊन स्वहिस्सा भरला आहे. त्यानुसार उर्वरित कामाच्या निविदा काढण्याचा धडाका सुरू आहे.

दरम्यान स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या संचालक मंडळाची सोळावी बैठक पार पडली. यात विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. आता महापालिकेचे कर्ज मंजूर झाल्याने या कामांना गती मिळाली आहे. स्मार्ट हेल्थ, स्मार्ट स्कूल, रस्ते, कौशल्य विकास केंद्र, स्ट्रीट डेव्हलपमेंट, सफारी पार्क आदी मागच्या दहा दिवसात या प्रकल्पांच्या एकूण १७ निविदा स्मार्ट सिटीतर्फे काढण्यात आल्या आहेत.

या कामांचा समावेश

निविदांमध्ये संत तुकाराम नाट्यगृहासाठी फायरफायटिंग यंत्रणा, मिटमिटा येथे सफारी पार्क साठी सिमेंट रस्ता, सिडको एन ५ येथील रस्त्यांचा पुनर्विकास, भाडेतत्त्वावर इलेक्ट्रिक बस ऑपरेटरची निवड, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे बांधकाम, कनॉट परिसरात स्ट्रीट ट्रान्सफॉर्मेशन, पैठण गेट ते गुलमंडी चौक मार्गाचा पुनर्विकास, सफारी पार्क येथे इमारतीचे बांधकाम, क्रांती चौक ते गोपाल टी मार्गाचा पुनर्विकास, वेदांतनगर येथील कम्यूनिटी सेंटरचे कौशल्य विकास केंद्र करण्यासाठी रिनोवेशन, नाथ सुपर मार्केटच्या तिसऱ्या मजल्याचे कौशल्य विकास केंद्र करण्यासाठी रिनोवेशन, शहरातील विविध ठिकाणी रस्ते आदींचा समावेश आहे.

Web Title: Aurangabad Smart City Campaign Momentum

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..