

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: शहरातील वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी स्मार्ट सिटी प्रशासनाने भाडेतत्त्वावर ई-बस घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, चार वर्षांपासून कंपनीने बस न देता झुलवत ठेवले. २०२२ मध्ये करारानंतरही अद्याप ३४ बस मिळाल्या नाहीत. ओलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या घोळानंतर आता केंद्र सरकारच्या 'पीएम-ई बस सेवा' योजनेअंतर्गत शहराला मिळणाऱ्या १०० बसबाबतही अनिश्चितता निर्माण झाली आहे.