Aurangabad : एवढे मंत्री झाले की, वाहने कमी पडताहेत! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sandipan bhumare

Aurangabad : एवढे मंत्री झाले की, वाहने कमी पडताहेत!

औरंगाबाद : राज्यात आपला जिल्हा खरंच नशीबवान आहे. राज्य सरकारमध्ये तीन कॅबिनेट मंत्री, केंद्रात दोन मंत्री आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेताही आपलाच आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी जे काही करता येईल ते करू. एकाच जिल्ह्यात एवढे मंत्री होण्याचा हा आतापर्यंतच पहिलाच योग असेल, एवढे मंत्री झाले की त्यांना वाहने कमी पडतायेत. पण तुम्ही मला पालकमंत्री केलं, त्यामुळे मी वाहनांसंदर्भात लवकरच निर्णय घेईल, असे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी शनिवारी (ता.१५) सांगितले.

हेही वाचा: Aurangabad : मागासवर्गीयांच्या आंदोलनामुळे बदलली भाजप संघाची भाषा

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतर्फे केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, सहकारमंत्री अतुल सावे, पालकमंत्री संदीपान भुमरे, कृषिमंत्री अतुल सावे यांच्या सत्कार करण्यात आला. बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष अर्जुन गाढे, जगन्नाथ काळे, अप्पासाहेब पाटील यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.

हेही वाचा: Aurangabad : कशाला हवेत सगळे ठाकरे एकत्र?

श्री. भुमरे म्हणाले की, जिल्ह्याला केंद्रात आणि राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळाले आहे, त्यातून शेतकऱ्यांसाठी काही चांगले निर्णय आपण घेऊ. ही बॅंक अडचणीतून बाहेर आली असली तरी अनिष्ट तफावतीचा मुद्दा कायम आहे. दिवंगत विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी लातूर जिल्हा बॅंक अनिष्ट तफावतीतून बाहेर काढली होती. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी देखील अशाच पद्धतीने नांदेड जिल्हा बॅंक वाचवली होती. आता आपण जिल्ह्यात पाच मंत्री, विरोधी पक्षनेता असे सहाजण आहोत, असा योग पुन्हा कधी येणार नाही. या संधीचा फायदा घेऊन आपण सगळे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ आणि या बॅंकेची देखील अडचणीतून सोडवणूक करू, असे आवाहन देखील त्यांनी उपस्थितीत मंत्र्यांना केले.

हेही वाचा: Aurangabad : योजना कागदावरच अन् खर्च वाढला ५५ कोटींनी

माझ्यासह अब्दुल सत्तार, विरोधी पक्षनेते बॅंकेचे संचालक आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवून त्यांनी जितकी मदत करणे शक्य होईल ती आपण केली पाहिजेत. मला पालकमंत्री करण्यासाठी अब्दुल सत्तार, अतुल सावे, संजय शिरसाट या सगळ्यांनीच प्रयत्न केले. २२ वर्षांनंतर जिल्ह्याला स्थानिक पालकमंत्री मिळाला आहे. त्याचा फायदा निश्चितच जिल्ह्यातील जनतेला करून देण्याचा माझा प्रयत्न राहील, अशी ग्वाही देखील भुमरे यांनी यावेळी दिली.