
छत्रपती संभाजीनगर : राज्य परिवहन महामंडळाचा छत्रपती संभाजीनगर विभाग सलग दुसऱ्या वर्षी नफ्यात आला आहे. गेल्या वर्षी १० कोटी ६७ लाख रुपयांचा नफा मिळवला होता. यंदा २०२४-२५ मध्ये तीन कोटी नफा झाला आहे. विशेष म्हणजे खर्च कमी करून उत्पन्न वाढवण्यात छत्रपती संभाजीनगर विभागाने बाजी मारली आहे.