Aurangabad: एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर खासगी शिवशाहीचा उतारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shivshahi-Bus.jpg

औरंगाबाद : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर खासगी शिवशाहीचा उतारा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : कर्मचाऱ्यांच्या संपाविरोधात एसटी महामंडळानेही आता कंबर कसली आहे. आता खासगी शिवशाही सुरु करण्यात येत आहेत. शुक्रवारी (ता. बारा) पुणे शहरासाठी दोन खासगी शिवशाही बंदोबस्तात रवाना करण्यात आल्या. दरम्यान, शुक्रवारी प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली नाही, त्यामुळे संपावरील कर्मचाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला.

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संपाला दहा दिवस होत आहेत. सुरवातीला मागे घेतलेला संप संघटनेशिवाय सुरु झालेला आहे. या संपात शंभर टक्के कर्मचारी सहभागी झाल्याने प्रवासी सेवा ठप्प झाली आहे. जिल्हाभरातील एकाही आगारातून बस निघाल्या नाहीत, मात्र शुक्रवारी प्रशासनाने औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानकातून पुणेसाठी सायंकाळी साडेचार वाजता आणि साडेपाच वाजता एक या प्रमाणे दोन खासगी अरहम ट्रॅव्हल्समार्फत चालवल्या जाणाऱ्या शिवशाही बस पुण्याकडे रवाना करण्यात आल्या.

हेही वाचा: मि. ५६ इंच घाबरलेत! चीनबाबत परस्परविरोधी दाव्यांवरून राहुल गांधींची टीका

एका बसमध्ये २५ तर दुसऱ्या बसमध्ये ३५ असे साठ प्रवासी पुण्यासाठी गेल्याची माहिती विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी दिली. एरवी शिवशाहीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसस्थानकावरच तिकीट दिल्या जाते. मात्र वाहक संपात सहभागी असले तरी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी वाहकांची भूमिका बजावत प्रवाशांना तिकिटे दिली. औरंगाबाद विभागात ११ खासगी शिवशाही आहेत, त्यामुळे टप्प्याने पुणे आणि नाशिकसाठी या बसगाड्या वाढवण्यात येत आहेत. येत्या काळात आणखी काही बस सुरु करता येतात का यावर विचार मंथन करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगीतले.

खासगीची मनमानीच

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवासी वाहतूक ठप्प झालेली असल्याने राज्य शासनाने खासगी वाहतूकदाराला परवानगी दिली आहे. त्यामुळेच मध्यवर्ती आणि मुख्य बसस्थानकाच्या परिसरातून भरभरून वाहतूक करण्यात येत आहे. मात्र भाड्यांवर मात्र कुणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. त्यामुळेच मनमानी पद्धतीने भाडे आकारणी सुरु झाली आहे. साधारण दीड ते दोन पट अधिक भाडे आकारल्या जात आहे. याशिवाय बसस्थानकाच्या परिसरात प्रवाशांच्या हाताला धरून वाहनात बसवण्याची वाहतूकदारांची स्पर्धाच सध्या सुरु आहे. या प्रकाराकडे पोलिस आणि आरटीओचे दुर्लक्ष होत असल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत.

loading image
go to top