Aurangabad : देवगिरीच्या वसतिगृहात विद्यार्थिनीची आत्महत्या

नोटबुकचे अर्धे पान, सुसाईड नोट पोलिसांच्या हाती
Sucide case
Sucide case

औरंगाबाद : देवगिरी महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहातील एका विद्यार्थिनीने खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. हा दुर्दैवी प्रकार २६ ऑगस्टच्या सायंकाळी साडेपाचदरम्यान उघडकीस आला. दरम्यान पोलिसांना नोटबुकचे अर्धे पान सुसाईड नोट लिहून ठेवल्याचे सापडल्याने अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या केल्याचे दिसते, अशी माहिती पोलिसांनी दिली. आरती सर्जेराव कोल्हे (१९, रा. गुरुपिंप्री, ता. घनसावंगी, जि. जालना) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

आरती ही बी. कॉमच्या पहिल्या वर्षात शिकत होती. २५ दिवसांपूर्वीच ती वसतिगृहात राहायला आली होती. तिचे आई-वडील शेतकरी असून तिला दोन बहिणी व एक भाऊ आहे. यासंदर्भात वेदांतनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनसार, तिने बी. कॉमच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतला. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मुलींच्या वसतिगृहात ती राहायला आली. तिच्या खोलीत एकूण पाच मुली राहायच्या. त्याही चांगल्या ओळखीच्या झाल्या. आरती नियमित लेक्चरही करत असे. आरती दोन दिवसांपूर्वीच वाळूजमध्ये राहणाऱ्या तिच्या मामांकडे जाऊन शुक्रवारी वसतिगृहात परतली होती. खोलीतील इतर चार मुली लेक्चरला गेल्या मात्र आरती खोलीतच थांबली होती.

सायंकाळी इतर मुली खोलीत आल्या तेव्हा दरवाजा लोटलेला होता. त्यांनी जोराचा धक्का देऊन दरवाजा उघडला तेव्हा आरतीने गळफास घेतल्याचे समोर आले. पोलिसांना कळविताच निरीक्षक सचिन सानप, उपनिरीक्षक उत्तरेश्वर मुंडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आरतीला घाटीत दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.

काय आहे सुसाइड नोटमध्ये

‘‘मी खूप साधी आहे. बारावीपर्यंत खेडेगावात शिकले. मला शहरी वातावरणाची सवय नाही. शहराशी जुळवून घेताना कुचंबणा होतेय. माझे स्वप्न टाटा-बिर्लांसारखे मोठे होण्याचे आहे, असे जीवन समृद्ध करणारे जवळपास दोन पाने लिहिल्यानंतर अर्ध्या पानात तिने माझ्या सर्व मैत्रिणी चांगल्या आहेत, पण तीन वर्षांचे बी. कॉम. आहे. सहा सेमिस्टर शिकायचे आहेत. हे झेपेल की नाही याबाबत माझ्या मनात शंका आहेत. मी गेल्यावर कोणीही होस्टेल सोडू नका.’’

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com