औरंगाबाद विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sexual Harassment
औरंगाबाद : बजाजनगर येथील एका विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार

औरंगाबाद : बजाजनगर येथील एका विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार

वाळूजमहानगर : वाळूज परिसरातील बजाजनगर येथील बी. कॉम.च्या पहिल्या वर्गात शिकणाऱ्या २१ वर्षीय विद्यार्थिनीवर तिच्याच २६ वर्षीय मित्राने लग्नाचे आमिष दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार (exual harassment) केला. हा प्रकार बुधवारी (ता.१२) उघडकीस आला.

बजाजनगर येथील एका महाविद्यालयात २१ वर्षीय विद्यार्थिनी बी.कॉम, प्रथम वर्ष या वर्गात शिक्षण घेते. तिच्या गावात दिनेश रोहिदास शेलार (२६) हा मुलगा राहतो. लहानपणापासून त्यांची ओळख आहे. त्यामुळे एकमेकांशी मैत्री निर्माण झाली.

हेही वाचा: खुनाच्या गुन्ह्यात जामीनावर सुटलेल्या मुलासह वडिलांचा खून

ते एकमेकांना आवडत असल्याने ते एकमेकांना भेटत होते. मी तुझ्याशीच लग्न करीन, असे तो तिला नेहमी आमिष दाखवून लैंगिक अत्याचार करत होता. ५ मार्च २०२१ रोजी दिनेश शेलार याचे नात्यातील मुलीशी लग्न झाल्याचे तिला माहित झाले. त्यानंतर तिने दिनेश शेलारशी सर्व संबंध तोडून टाकले. त्यानंतरही तो तिला वेळोवेळी फोन करुन शारीरिक संबंधाची मागणी करु लागला. तेव्हा त्यास विरोध केला असता तो तिला नेहमी तिच्या बदनामीची धमकी देत असे. ६ जानेवारी २०२२ रोजी दिनेश हा तिला भेटला.

हेही वाचा: रोजगार एवढा देऊ की कॅनडाहून शीख परततील: केजरीवाल

यावेळी म्हणाला की, मला तुझ्या सोबत बोलायचे आहे, लॉजवर चल. असे म्हणून त्याने तिला हॉटेल साईकृपा लॉज येथे घेऊन गेला. तेथे त्याने तिला शरीरसंबंध करु दे, नाहीतर तुझी बदनामी करील, अशी धमकी दिली व बळजबरीने तिच्या इच्छेविरुध्द लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर त्याने अनेक वेळा बदनामी करण्याची भीती घालून इच्छेविरुध्द अत्याचार केले. बदनामी होण्याची भीती वाटत असल्याने तिने कोणाला माहिती दिली नाही. शेवटी आईला हकिकत सांगितली. नंतर आईसह एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने बुधवारी (ता.१२) दिनेश रोहिदास शेलार (२६) रा. तिसगाव याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top