Aurangabad : ही वास्तू म्हणजे एकीचे बळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Subordinate Engineer Association new building Inauguration

Aurangabad : ही वास्तू म्हणजे एकीचे बळ

औरंगाबाद : सबऑर्डिनेट इंजिनियर असोसिएशनची नवी वास्तू केवळ वास्तू नसून ती एकीचे बळ आहे. इतकी मोठी संस्था मराठवाड्यासारख्या ठिकाणी उभे राहणे म्हणजे अभिमानास्पद बाब आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले. सब-ऑर्डिनेट इंजिनियर असोसिएशनच्या को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या नव्या वास्तूचे उद््घाटन व ४४ वी सर्वसाधारण सभा रविवारी (ता.२५) तापडिया नाट्यमंदिरात पार पडली. व्यासपीठावर सहकारमंत्री अतुल सावे, आमदार सतीश चव्हाण, सोसायटीचे अध्यक्ष आबासाहेब मोराळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. कराड म्हणाले, की या सोसायटीने बांधलेल्या इमारतीप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारती हव्या. ही इमारत अत्यंत सुटसुटीत आणि सोयीसुविधांनी युक्त आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या पतसंस्थेचा एनपीए अत्यंत कमी असून ही आदर्श गोष्ट आहे. इतकेच नव्हे तर सभासदाच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसदाराला पंधरा लाख रुपये देण्याची योजना अत्यंत उपयोगी आहे.

दरम्यान संस्थेच्या अधिकाऱ्यांनी सरकार जे नवीन अलाईमेंटस आणत आहे. त्याचा विचार व्हावा, आम्ही मोदींच्या मनची गोष्ट ऐकली, आता केंद्र सरकारलाही आमच्या मनची गोष्ट ऐकवा असेही सांगितले. आमदार सतीश चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.

महापारेषणचे प्रकल्प संचालक नसीर कादरी, महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉक्टर मंगेश गोंदवले, कार्यकारी संचालक रोहिदास मस्के, उपाध्यक्ष संतोष खुमकर, सरचिटणीस संजय ठाकूर, संघटन सचिव अरुण गीते, महावितरणचे मुख्य अभियंता भुजंग खंदारे, सुंदर लटपटे, मोहन आव्हाड, धनंजय औंढेकर, रंगनाथ चव्हाण, संजय सरग, हर दयाल जैस्वाल, गुलशन चोप्रा, बाल मुकुंद सोमवंशी, दिनकर पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

यासाठी सब-ऑर्डिनेट इंजिनियर असोसिएशन चे सचिव अविनाश सानप, कोषाध्यक्ष शिवाजी आहेर, प्रादेशिक सचिव अविनाश चव्हाण, प्रादेशिक समन्वयक जनार्दन चौधरी यांच्यासह सर्व संचालक मंडळाने परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश सानप यांनी केले. आभार शिवाजी आहेर यांनी मानले.

राज्यातील सोसायट्यांवर वॉच ः सहकारमंत्री सावे

सहकारमंत्री सावे म्हणाले, की आम्ही बऱ्याच पतसंस्था बघतो. पण त्यांच्या कारभारात अनियमितता दिसून येते. मात्र ही संस्था आदर्श घेण्यासारखी आहे. अभियंते चांगली पतसंस्थाही चालू शकतात त्याचे हे मूर्तीमंत उदाहरण आहे. राज्यातील अनेक सोसायट्या संकटात आहेत. यामुळे आमचा सर्व संस्थांवर वॉच आहे.