Osmanabad : ठाकरे-शिंदे गटात घोषणाबाजी, आरडाओरडीची रंगली जुगलबंदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

aurangabad news

Osmanabad : ठाकरे-शिंदे गटात घोषणाबाजी, आरडाओरडीची रंगली जुगलबंदी

उस्मानाबाद : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी ठाकरे आणि शिंदे गट आमनेसामने आले. सभागृहात प्रवेशावरून दोन्ही गटांतील पदाधिकारी-कार्यकर्त्यांत घोषणाबाजी, आरडाओरडीची जुगलबंदी रंगली. पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना बाहेर काढल्यानंतर परिसर शांत झाला.

हेही वाचा: Aurangabad : लोकशाही नव्हे,देशात हुुकूमशाही

राज्यात सत्ता परिवर्तनानंतर जिल्हा नियोजन समितीची आज प्रथमच बैठक होणार होती. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात येताच पालकमंत्री तानाजी सावंत सभागृहाकडे वळले. शिंदे गटाचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत सभागृहात जाण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी त्यांना रोखले. काही ठराविक कार्यकर्त्यांना प्रवेश देण्याचा प्रयत्न सुरू झाला. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यावर आक्षेप घेत आरडाओरड सुरू केली. काहीशी तणावाची स्थिती निर्माण झाल्याने पोलिसांनी कोणालाही सभागृहात प्रवेश दिला नाही.

हेही वाचा: Aurangabad : कशाला हवेत सगळे ठाकरे एकत्र?

त्यानंतर सुमारे १५ ते २० मिनिटे सभागृहाबाहेर कार्यकर्त्यांची घोषणाबाजीने जुगलबंदी सुरू होती. दोन्ही गट एकमेकांना बोट दाखवत होते. अखेर पोलिसांनी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना बाहेर काढले. याचवेळी काही कार्यकर्ते दुसऱ्या बाजूला उभे होते. त्यांनाही बाहेर काढा, असे म्हणत दोन्ही गट एकमेकांकडे बोट दाखवत होते. पोलिसांना समान न्याय देत दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांना बाहेर काढल्यानंतर परिसरात शांतता निर्माण झाली