Aurangabad : ज्या कंपनीत करायचा काम तिथेच केली चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चोरी

Aurangabad : ज्या कंपनीत करायचा काम तिथेच केली चोरी

औरंगाबाद : करोडी शिवारातील एका कंपनीतील एमएसईबीचे तब्बल चार लाख ६४ हजार ४९० रुपयांचे साहित्य चोरी प्रकरणातील तिघा आरोपींना दौलताबाद पोलिसांनी १९ जानेवारीरोजी अटक केली.

सचिन विलास भोसले (२८ वर्षे रा. पळसगाव ता. खुलताबाद, देवेंद्र नानासाहेब साळुंके (२७, रा. वक्ती पानवी ता. वैजापूर) आणि त्याच कंपनीत काम करणाऱ्या कामगाराचा साथीदार बापू गवराम रहाणे (४२ वर्षे रा. घाणेगाव ता. गंगापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

तर उर्वरित त्याच कंपनीत काम करणारे दोन आरोपी कामगार फरार असून त्यांचा शोध घेत असल्याचेही पोलिसांनी सांगितले. आरोपींना न्यायालयाने २१ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस निरीक्षक विनोद सलगरकर यांनी दिली.

आरोपींनी करोडी शिवारातील करोडी शिवारातील गुरुदत्त इंडस्ट्रीज या कंपनीतून चार लाख ६४ हजार ४९० रुपयांचे साहित्य चोरी गेल्याची तक्रार कंपनी मालक रामानंद प्रेमसिंग चव्हाण (४३, रा.वाळूजमहानगर एक) यांनी दौलताबाद पोलिसांत दिली होती.

आधी वाहने पकडली अन् मग आरोपी

गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून अगोदर साहित्य नेणारी वाहने पकडली. त्याआधारे आरोपी सचिनच्या ताब्यातून ७६ हजार २८५ रुपयांचे साहित्य तर देवेंद्र नानासाहेब साळुंके (२७, रा. वक्ती पानवी ता. वैजापूर) याला गावातून ताब्यात घेत त्याच्या ताब्यातून एक लाख २६ हजार २८० किमतीचे साहित्य तसेच कंपनीत काम करणाऱ्या दोघा आरोपींचा साथीदार बापू गवराम राहाणे (४२, रा. घाणेगांव ता. गंगापूर) या तिघांना अटक केली.

उर्वरित दोघा फरार आरोपींना अटक करणे बाकी असून त्यांचाही शोध घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कामगिरी निरीक्षक सलगरकर यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक संजय गित्ते, उपनिरीक्षक आयुब पठाण, रफीक पठाण, राजेश पाटील, संजय दांडगे, बंडू गोरे, प्रताप काकरवाल यांनी केली केली.