esakal | पहिल्या दिवशी ६५ हजारांवर विद्यार्थ्यांनी दिली ‘मॉक टेस्ट’

बोलून बातमी शोधा

पहिल्या दिवशी ६५ हजारांवर विद्यार्थ्यांनी दिली ‘मॉक टेस्ट’
पहिल्या दिवशी ६५ हजारांवर विद्यार्थ्यांनी दिली ‘मॉक टेस्ट’
sakal_logo
By
संदीप लांडगे

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे सर्वच पेपर ऑनलाइन होणार आहेत. या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता. २८) पहिल्या दिवशी ६५ हजार ४९४ विद्यार्थ्यांनी ‘मॉक टेस्ट’ दिली. पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा १६ मार्च व सहा एप्रिलपासून सुरू करण्यात आल्या. तथापि, १५ एप्रिल ते दोन मे या दरम्यान शासनाने निर्बंध घातल्याने सर्व पेपर स्थगित करण्यात आले. यानंतर गेल्या आठवड्यात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक होऊन येथून पुढील सर्व पेपर हे ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा: खासदार जलील रुग्णांच्या मदतीला, घाटीला चार हजार सलाईनच्या बॉटल्स दिल्या भेट

या संदर्भात कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी कोविडची सर्व नियमावली पाळून परीक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सर्वच महाविद्यालयात ‘आयटी’ को-ऑर्डिनेटरची संख्या दुपटीने वाढविली आहे. पदवीचे उर्वरित पेपर तीन मेपासून तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा पाच मेपासून ऑनलाइन पद्धतीने होईल. संबंधित विद्यार्थ्यांनी २८ एप्रिल ते दोन मेदरम्यान ऑनलाइन मॉक टेस्ट’ होत आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता.२८) पहिल्या दिवशी ६५ हजार ४९४ विद्यार्थ्यांनी ‘मॉक टेस्ट’ दिली. चारही जिल्ह्यात परीक्षा यशस्वीपणे होत असून अद्याप एकाही विद्यार्थ्यांची लेखी तक्रार परीक्षा विभागास प्राप्त झालेली नाही. काही अडचण आल्यास आपल्या महाविद्यालयाच्या ‘आयटी को-ऑर्डिनेटर’शी संपर्क साधावा, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी केले.