esakal | लसीचा तुटवडा, ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण तूर्तास बंद
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccine

लसीचा तुटवडा, ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण तूर्तास बंद

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. ४५ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणासाठी महापालिकेने जंम्बो लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत. मात्र दर आठवड्याला एक लाख लसीची मागणी असताना, सरकारकडून केवळ २५ ते ३० हजार लस मिळत आहे. त्यामुळे लस उपलब्ध होईपर्यंत लसीकरण केंद्र बंद राहणार आहे. शहरात कोरोना संसर्गाचा उद्रेक होताच महापालिकेने लसीकरणावर जोर दिला आहे. त्यासाठी ११५ वॉर्डात लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली. ४५ वर्षावरील नागरिकांसाठी जम्बो मोहिम सुरू केली. आतापर्यंत ४५ वर्षावरील सुमारे २ लाख ३६ हजार नागरिकांचे लसीकरण झाले.

हेही वाचा: मराठवाड्यात कोरोना रुग्णसंख्येत काहीशी घट, ६ हजार ३१५ नवे बाधित

नागरिकांचा लसीकरणाला प्रतिसाद मिळत असला तरीही लस मिळण्यास अडचणी येत आहे. दर आठवड्याला एक लाख लस मिळावी अशी मागणी महापालिकेने केली आहे. परंतु सरकारकडून २५ ते ३० हजार लस मिळत आहे. मागच्या आठवडयात अत्यंत कमी प्रमाणात लस उपलब्ध झाल्यामुळे वॉर्डातील लसीकरण केंद्र बंद ठेवावे लागले. जो पर्यंत लस मिळत नाही, तोपर्यंत लसीकरण सुरू केले जाणार नाही. लसीचा पुरसा साठा नसल्याने ४५ वर्षावरील नागरिकांनी केंद्रावर गर्दी करु नये, असे आवाहन मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी केले आहे.

loading image