esakal | मराठवाड्यात कोरोना रुग्णसंख्येत काहीशी घट, ६ हजार ३१५ नवे बाधित
sakal

बोलून बातमी शोधा

पलूस तालुक्‍यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दुधोंडी गावात आज एका दिवसात आणखी पाच कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.

मराठवाड्यात कोरोना रुग्णसंख्येत काहीशी घट, ६ हजार ३१५ नवे बाधित

sakal_logo
By
टीम ई सकाळ

औरंगाबाद : मराठवाड्यात रविवारी (ता.दोन) कोरोना रुग्णसंख्येत काहीशी घट झाल्याचे दिसले. विशेषतः आतापर्यंतच्या तुलनेत औरंगाबाद, नांदेडची रुग्णसंख्या लक्षणीय कमी झाली. दिवसभरात ६ हजार ३१५ कोरोनाबाधित आढळले. गेल्या आठवड्यात ही संख्या रोज सात हजारांच्या आसपास होती. जिल्हानिहाय आज वाढलेली रुग्णसंख्या अशी ः बीड १३४५, लातूर ११२६, जालना ९३५, औरंगाबाद ८३५, परभणी ८२१, नांदेड ५१८, उस्मानाबाद ४८६, हिंगोली २४९. उपचारादरम्यान १२१ जणांच्या मृत्यूची नोंद आज झाली. त्यात औरंगाबादेत २८, नांदेड २५, लातूर २३. जालना १५, बीड १०, परभणी ९, उस्मानाबाद ६ तर हिंगोलीतील ५ जणांचा समावेश आहे.

हेही वाचा: निसर्गाचा निर्दयीपणा! वीज पडून दोघांचा औरंगाबाद तालुक्यात दुर्दैवी मृत्यू

बजाजनगर येथील महिला (वय ७०), गारखेडा येथील पुरुष (६८), वैजापूर येथील पुरुष (७०), सिडको एन-सहा येथील महिला (६५), सिल्लोड येथील महिला (५०), सोयगाव येथील महिला (३८), पैठण येथील पुरुष (५०), क्रांती चौक येथील महिला (६२), गारखेडा येथील महिला (५२), सिल्लोड येथील पुरुष (४०), सिल्लोड येथील महिला (४५), उंडणगाव (ता. सिल्लोड) येथील महिला (८८), लोणवाडी (जि. औरंगाबाद) येथील पुरुष (६५), कन्नड येथील पुरुष (७२), आरेफ कॉलनी येथील नऊ महिन्याची मुलगी, वैजापूर येथील महिला (६२), आमखेडा (जि. औरंगाबाद) येथील पुरुष (२९), वडगाव कोल्हाटी (जि. औरंगाबाद) येथील पुरुष (२५), सिल्लोड येथील पुरुषाचा (६२) घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. दावरवाडी (ता. पैठण) येथील पुरुष (६०), जरांडी (ता. सोयगाव) येथील पुरुष (७६), करमाड येथील महिला (६२), हर्सूल औरंगाबाद येथील पुरुषाचा (४८) जिल्हा रुग्णालयात तर बीड बायपास औरंगाबाद येथील

महिला (५२), सिडको एन-९ येथील महिला (७४), शिवशंकर कॉलनी औरंगाबाद येथील पुरुषाचा (७०) खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.

हेही वाचा: औरंगाबाद जिल्ह्यात शेतात पाणी देत असताना शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला, लोकांमध्ये दहशत

औरंगाबादेत वाढले ८३५ रुग्ण : औरंगाबाद जिल्ह्यात दिवसभरात ८३५ कोरोनाबाधितांची भर पडली. त्यात शहरातील ३७३, ग्रामीण भागातील ४६२ जणांचा समावेश आहे. रुग्णांची संख्या १ लाख २६ हजार १७६ वर पोचली असून आणखी १ हजार ३९७ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत १ लाख १२ हजार ५४२ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ११ हजार ७७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, आणखी २८ जणांचा मृत्यू झाला. मृतांची संख्या २ हजार ५५७ झाली आहे.

loading image