पर्यटनस्थळे हाऊसफुल! मकबरा, वेरूळ- अजिंठ्याला पर्यटकांची गर्दी

कोरोना नियमामुळे प्रत्येक पर्यटनस्थळी दिवसभरात केवळ दोन हजार पर्यटकांना प्रवेश देण्यात आला
bibi ka makbara
bibi ka makbarabibi ka makbara

औरंगाबाद: जिल्ह्यातील पर्यटनस्थळे गुरुवारपासून (ता. १७) अनलॉक झाली आहेत. यानंतर पहिल्याच रविवारी (ता. २०) जिल्ह्यातील पर्यटनस्थळे हाऊसफुल झाली होती. मकबरा, वेरूळ, अजिंठा लेणी, दौलताबाद किल्ल्यावर पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. बहुतांश सर्वच ठिकाणी प्रत्येकी दोन हजार असे एकूण ८ हजार २५० पर्यटकांनी भेटी देत पर्यटनाचा आनंद घेतला.
गेल्या तीन ते चार महिन्यांपासून पर्यटनस्थळे बंद होती. यामुळे यावर अवलंबून असलेल्यांचे जनजीवन विस्कळित झाले होते. पर्यटनस्थळ अनलॉक झाल्यानंतर पहिल्याच दिवशी दोन ते तीन हजार पर्यटकांनी जिल्ह्यातील सर्वच पर्यटनस्थळी भेट दिली होती. लॉकडाऊनमुळे घरात असलेल्या लोकांनी ‘संडेला’ पर्यटनवारीसाठी घराबाहेर पडण्यास पसंती दिली.

कोरोना नियमामुळे प्रत्येक पर्यटनस्थळी दिवसभरात केवळ दोन हजार पर्यटकांना प्रवेश देण्यात आला. वेगवेगळ्या जिल्‍ह्यासह विविध राज्यातूनही पर्यटक आले होते. यात औरंगाबाद शहरातील बिबिका मकबरा येथे १ हजार ९२१ पर्यटकांनी भेटी दिल्या. औरंगाबाद लेणीलाही एक ते दीड हजार पर्यटक आले होते. वेरूळ लेणी येथेही दोन हजार पर्यटकांनी भेटी दिल्या. दौलताबाद येथील देवगिरी किल्ला पाहण्यासाठी जवळपास दोन हजार पर्यटक आले होते. तर अजिंठा लोणीला दिवसभरात ७५० तसेच सिद्धार्थ उद्यानातही मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी भेटी दिल्या आहेत, अशी माहिती भारतीय पुरातत्त्व विभागातर्फे देण्यात आली आहे.

bibi ka makbara
दुसरी लाट ओसरली, आता कोरोना मृत्यूदरातही घट

नियमांचे काटेकोरपणे पालन
सर्वच पर्यटनस्थळे सुरु करताना प्रशासनाने काही निर्बंध घातले आहेत. यात पर्यटकांना विना मास्क प्रवेश देण्यात आला नाही. सर्वांची थर्मलगनच्या माध्यमातून टेंपरेचर आणि ऑक्सिमीटरच्या माध्यमातून ऑक्सिजन तपासून पर्यटकांना प्रवेश देण्यात आला. सर्व पर्यटनस्थळेही सॅनिटाईज करण्यात आलेली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com