परवाना शुल्क व्यापाऱ्यांकडून घेऊ नका, सुभाष देसाईंकडे मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परवाना शुल्क व्यापाऱ्यांकडून घेऊ नका, सुभाष देसाईंकडे मागणी

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या निर्देशानुसार बाजारपेठा बंद होत्या. या बंदीच्या काळामध्ये शहरातील नागरिकांना उद्योजकांना व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

परवाना शुल्क व्यापाऱ्यांकडून घेऊ नका, सुभाष देसाईंकडे मागणी

औरंगाबाद : महापालिकेतर्फे Aurangabad Municipal Corporation उत्पन्नवाढीसाठी नव्याने व्यापाऱ्यांना परवाना शुल्क लावण्यात येत आहे. यास आमचा विरोध आहे. आस्थापना परवाना शुल्क आकारण्यात येऊ नये, अशी मागणी जिल्हा व्यापारी महासंघातर्फे Aurangabad District Traders Association पालकमंत्री सुभाष देसाई Subhash Desai यांच्याकडे सोमवारी(ता.२८) निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे व शिष्टमंडळाने सोमवारी पालकमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेत या मागणीचे निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, परवाना शुल्क वाढीच्या निर्णयाला आमचा विरोध आहे. कोरोनाच्या Corona प्रादुर्भावामुळे शासनाच्या निर्देशानुसार बाजारपेठा बंद होत्या. या बंदीच्या काळामध्ये शहरातील नागरिकांना उद्योजकांना व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या संदर्भात आम्ही वेळोवेळी शासन दरबारी आर्थिक मदतीची मागितली, मात्र अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही. महापालिकेतर्फे अशा आर्थिक अडचणीत असताना नव्याने परवाना शुल्क आकारण्यात येत आहे. हा कर अन्यायकारक आहे.aurangabad traders demand do not collect permit fees

हेही वाचा: औरंगाबाद महापालिकेकडे फक्त ५५० कोरोना प्रतिबंधक लसी शिल्लक!

व्यवसाय सुरू करताना राज्य शासनाने शॉपॲक्ट नोंदणी व नोंदणीशुल्क बंधनकारक आहे. असे असताना महापालिकेने स्वतःचे उत्पन्न वाढविण्यासाठी परत व्यापाऱ्यांकडून नव्याने शुल्क भरून घेणे व नोंदणी करणे हे अन्यायकारक असल्याचे ही निवेदनात म्हटले आहे. सचिव लक्ष्मीनारायण राठी, अजय शहा मनसुख झांबड, विजय जैस्वाल, आमदार अंबादास दानवे बाळासाहेब थोरात उपस्थित होते.

Web Title: Aurangabad Traders Demand Do Not Collect Permit

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Trader