Aurangabad : विजेच्या धक्क्याने दोन बैलांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bulls death

Aurangabad : विजेच्या धक्क्याने दोन बैलांचा मृत्यू

माणिकनगर : विजेच्या धक्क्याने दोन बैलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवाची घटना शुक्रवारी (ता. २१) सकाळी गेवराई सेमी (ता. सिल्लोड) येथे घडली. अधिक माहिती अशी की, शुक्रवारी सकाळी गेवराई सेमी परिसरात रिमझिम पाऊस झाला. काही वेळाने एकनाथ सांगळे हे बैलांसह इतर जनावरे चरण्यासाठी सुळ्याच्या डोंगराकडे घेऊन जात होते.

हेही वाचा: Aurangabad : 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ मोहिमेचा एक लाख जणांना लाभ

गेवराई सेमी ते उमरावती रस्त्यातील चौफुलीवर असलेल्या रोहित्राचा शॉक लागून दोन बैलांचा मृत्यू झाला. घटनेचे गांभीर्य पाहून एकनाथ सांगळे यांनी इतर जनावरांना बाजूला हटविले. घटनेची माहिती मिळताच महावितरणने वीजपुरवठा बंद केला.

हेही वाचा: Aurangabad : गरिबांच्या घरांसाठी नुसता टाइमपास

सहायक अभियंता सईद खान यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ तंत्रज्ञ विजय गोराडे, दत्ता गोराडे, शैलेश कांबळे यांनी घटनास्थळी भेट देवून अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठविला. तसेच तलाठी प्रशांत देवगया यांनीही प्राथमिक पाहणी करून अहवाल तहसील कार्यालयास सादर केला. तर, वडोदबाजार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर बिट जमादार फकीरचंद जारवाल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

हेही वाचा: Aurangabad : अतिवृष्टीची भरपाई; गंगापूरला ११ कोटी मंजूर

सांगळे कुटुंबावर संकट

गेवराई सेमी येथील एकनाथ सांगळे हे अल्पभूधारक असून, त्यांच्याकडे असलेली शेतीही कोरडवाहू आहे. सततच्या पावसामुळे शेत नापिक झाले आहे. घरातील पाच जण कसाबसा उदरनिर्वाह करीत आहेत. यातच दोन बैलांचा मृत्यू झाल्याने एकनाथ सांगळे यांचे एक लाख वीस हजारांचे नुकसान झाले आहे. सदरील कुटुंबाला शासनाच्या वतीने नुकसान भरपाई देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.