
औरंगाबाद : 'जिल्हाधिकाऱ्यांच्या' विरोधात दोन अवमान याचिका
औरंगाबाद : सिल्लोड (जि. औरंगाबाद) नगर परिषदेच्या दोन नगरसेवकांना अपात्र करण्यासंदर्भातील निर्णय सहा महिन्यांत घेण्याची हमी देऊनही अपात्रतेबाबत निर्णय न घेतल्याप्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात दोन स्वतंत्र अवमान याचिका सादर करण्यात आल्या आहेत.
महेश शंकरलाल शंकरपल्ली व सायराबी शेख रहीम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे नंदकिशोर विठ्ठलराव सहारे आणि सरीता मनोज झंवर यांच्याविरोधात महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायत आणि औद्योगिक वसाहत कायदा १९६५ अंतर्गत अवैध बांधकामप्रकरणात अपात्र घोषीत करण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यांनी २०१९ ते २०२१ या काळात या अर्जावर काहीच कार्यवाही न केल्याने दोघांनी औरंगाबाद खंडपीठात अॅड. अंगद एल. कानडे यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती.
६ ऑक्टोबर २०२१ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी झालेल्या सुनावणीत सदर अपात्रतेचा अर्ज सहा महिन्यांत निकाली काढण्याची हमी दिली होती. परंतू अपात्रतेचा अर्ज निकाली न काढल्याने अवमान याचिका सादर करण्यात आली आहे.