Unlock: आजपासून आणखी १३ बस रस्त्यावर; 12 मार्गावर होणार ४४४ फेऱ्या

प्रवाशांच्या मागणीनुसार दुसऱ्या टप्प्यातील बससेवाही सोमवारी (ता.२१) सकाळी नऊ वाजेपासून सुरू करण्यात येईल
unlock
unlockunlock
Updated on

औरंगाबाद: औरंगाबाद स्मार्ट सिटी बस विभागातर्फे नव्याने १३ बस सुरू करण्यात येणार आहेत. सोमवारपासून (ता. २१) १२ मार्गांवर या बस धावणार आहेत. एकूण ३२ बसच्या विविध मार्गांवर ४४४ फेऱ्या होणार आहेत, अशी माहिती स्मार्ट सिटी बससेवा विभागाचे वरिष्ठ अधिकारी सिद्धार्थ बनसोड यांनी रविवारी (ता. २०) दिली.

सिद्धार्थ बनसोड म्हणाले की, आठ जूनपासून स्मार्ट सिटीची बससेवा सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात सुरू झालेल्या बससेवेला सहा मार्गांवर प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला. प्रवाशांच्या मागणीनुसार दुसऱ्या टप्प्यातील बससेवाही सोमवारी (ता.२१) सकाळी नऊ वाजेपासून सुरू करण्यात येईल. यामध्ये औरंगपुरा ते बजाजनगर, औरंगपुरा ते हिंदुस्थान आवास, बाबा पेट्रोल पंप ते चिकलठाणा, हर्सूल सावंगी ते नक्षत्रवाडी, सिडको ते रांजणगाव, मध्यवर्ती बसस्थानक ते करमाड या १२ मार्गांवर ४४४ फेऱ्या मार्फत ३२ बससेवा देतील.

unlock
पर्यटनस्थळे हाऊसफुल! मकबरा, वेरूळ- अजिंठ्याला पर्यटकांची गर्दी

बसचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. प्रवाशांना कोरोनाची सर्व नियमावली समजावून सांगण्यात येईल. शिवाय मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि आरोग्यविषयक सूचनांचे पालन करण्याच्या सूचनाही देण्यात येणार आहे, असेही सिद्धार्थ बनसोड यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kunbi certificate latest update Maharashtra
New Harsul Development
Children, Smartphones and Mental Health: Why Parents Need to Take Mobile Addiction Seriously
Chandgude Family Tragedy
Marathi News Esakal
www.esakal.com