

Chhatrapati Sambhajinagar News
esakal
छत्रपती संभाजीनगर: जिल्हाभरात बुधवारी (ता.१९) वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला, तर काही भागांत अक्षरशः गारांचा पाऊस पडला. या पावसामुळे रब्बी पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाजात समोर आले. प्रामुख्याने सोयगाव तालुक्यात २९१ हेक्टरवर आणि कन्नड तालुक्यात ६०७ हेक्टरवर शेतीपिकांचे नुकसान झाले आहे.