औरंगाबाद : विडी सिगारेटचे खुलेआम झुरके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विडी-सिगारेट

औरंगाबाद : विडी सिगारेटचे खुलेआम झुरके

औरंगाबाद : सार्वजनिक ठिकाणी झुरका मारणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बस, रेल्वे, रस्त्याच्या कडेला, पानटपरी, चहा स्टॉल अशा बहुतांश ठिकाणी कुणी ना कुणी सिगारेट, विडीचा झुरका मारताना हमखास दिसेल. महाराष्ट्रात कायद्यानुसार २०१९ ते २०२१-२२ या तीन वर्षांत ५७ हजार १४९ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. कायद्यानुसार फक्त दोनशे रुपये दंड आकारला जात असल्याने, प्रभाव अंमलबजावणी होत नसल्याने बहुतांश जण या कायद्याला जुमानत नाहीत.

केंद्र सरकारने २००३ पासून हा कायदा लागू केल्याने सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास मनाई आहे. या कायद्यात एकूण पाच प्रमुख कलमे आहेत. त्यापैकी सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे गुन्हा आहे. कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या १०० यार्ड आवारात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर प्रतिबंध आहे. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांकडून घटनास्थळीच कोटपा कायद्यानुसार दोनशे रुपयांपर्यंत दंड वसूल करावा, अशी तरतूद आहे. या कायद्याने सार्वजनिक स्थळांचा त्यात समावेश आहे. तसेच तीस खोल्यांचे किंवा ३० पेक्षा जास्त व्यक्तींची आसन क्षमता असलेली हॉटेल, एअरपोर्टमध्ये धूम्रपानासाठी दिलेली जागा, तसेच धूम्रपानासाठी ठरविलेल्या जागांव्यतिरिक्त त्यास कायद्याने मनाई आहे.

राज्य दंड व्यक्तींची संख्या

कर्नाटक ५,०७,७६३

केरळ २,११,४५७

गुजरात १,२७,९३०

महाराष्ट्र ५७,१४९

दिल्ली ४५,६३८

पंजाब ४४,१४६

गोवा २८,५६१

उत्तर प्रदेश १०,७४२