औरंगाबादचा पाणीप्रश्न वर्षभरात कायमचा सोडविणार; संदीपान भुमरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad water scarcity problem

औरंगाबादचा पाणीप्रश्न वर्षभरात कायमचा सोडविणार; संदीपान भुमरे

पाचोड : पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारताना सर्वप्रथम शहराचा पाणीप्रश्न व जिल्ह्यातील वीज व रस्त्याचा प्रश्न सोडविण्यावर आपण प्राधान्याने काम करू तसेच जिल्ह्याच्या विकासासाठी कोणताही निधी कमी न पडू देता औरंगाबादचा विकास करून चेहरामोहरा बदलू, असे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री तथा औरंगाबादचे नवनियुक्त पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी केले आहे.

सोमवारी (ता.२६) जन्मगावी पाचोड (ता.पैठण) येथे पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. मंत्री भुमरे म्हणाले की, २२ वर्षानंतर जिल्ह्याला स्थानिक पालकमंत्री मिळाला. माजी खासदार चंद्रकांत खैरे व अंबादास दानवे माझ्यावर टीका करीत आहेत. मात्र, खैरे केवळ पूजा करीत बसले. त्यांच्यामुळे जिल्ह्याची वाट लागली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर सोपविलेल्या पालकमंत्री पदाची जबाबदारी मी योग्य रीतीने पार पाडून जिल्ह्याचा विकास करेन.

सर्वप्रथम औरंगाबाद शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणार असून त्यानंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न सोडविण्यात येईल. प्रत्येक शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतापर्यंत जाण्यासाठी पक्के रस्ते उपलब्ध करून देण्यात येतील.