औरंगाबाद : जिल्हा पाणी टंचाईमुक्तीकडे

जून सुरू झाला तरी पाण्याची जाणवली नाही टंचाई
Aurangabad water scarcity relief no shortage of water
Aurangabad water scarcity relief no shortage of watersakal
Updated on

औरंगाबाद : दुष्काळ, पाणीटंचाईची चर्चा सुरू झाली की त्यात मराठवाड्यातील जिल्ह्यांचे नाव नेहमीच घेतले जाते. मात्र, आता गेल्या सहा वर्षांपासून पाणीटंचाईचा आढावा घेऊन विचार केल्यास गेल्या वर्षाप्रमाणे परिस्थिती नसून यंदा समाधानाची परिस्थिती आहे. यंदा जिल्हा पाणीटंचाई मुक्तीकडे जात आहे. त्याचे कारण म्हणजे मे महिना संपला तरीही अद्याप जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात पाणी टंचाईच्या झळा लागल्या नाहीत.

दोन वर्षापासून जिल्ह्यात होणाऱ्या सरासरीपेक्षा जास्त पावसामुळे पाणीपातळीत वाढ झाली आहे. एप्रिल व मे महिना सुरू झाला की जिल्ह्यातील वाड्या, वस्ती, तांडे, गावातून टँकरच्या मागणीला सुरवात होते. यात जिल्हा परिषदेच्यावतीने वाड्या, वस्ती व गावांसाठी टँकर, खासगी विहिरी अधिग्रहण करून पाणीपुरवठा केला जातो. तथापि, यावर्षी टंचाईग्रस्त गावांची संख्या जवळपास नसल्यासारखीच आहे. मे महिन्यात जिल्ह्याची सरासरी भूजल पातळी १२.३६ असून ती मार्च मध्ये १०.६० मीटर, जानेवारी मध्ये ८.६१ मीटर तर ऑक्टोबर महिन्यात ४.०३ मीटर होती.

जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये यावर्षी सरासरी भूजल पातळी ऑक्टोबर, जानेवारी, मार्च, आणि मे मधील भूजल पातळी या प्रमाणे आहे. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने मे २०२२ महिन्यात केलेल्या निरीक्षणातून जमिनीखालच्या पाण्याच्या पातळी १२.३६ मीटर असल्याचे समोर आले आहे. मे महिन्यातील औरंगाबाद तालुक्यात सरासरी भूजल पातळी ११.२९ मीटर, फुलंब्री ११.८३ मीटर, कन्नड, पैठण १३. ६४ मीटर, गंगापूर १३.०१ मीटर, वैजापूर १४.३९ मीटर, खुलताबाद १४.१५ मीटर, सिल्लोड ११.२९ मीटर, कन्नड १३.७२ मीटर, सोयगाव तालुक्यात भूजल पातळी ७.९३ मीटर खाली गेली आहे.

चारवेळा होते भूजलाची नोंद

जिल्ह्यात ५२ पाणलोट क्षेत्रे आहेत. या क्षेत्रात १४१ विहिरींतील पाणी पातळीच्या आधारे भूजलाची पातळी ठरविण्यात येते. दरवर्षी जानेवारी, मार्च, मे आणि ऑक्टोबर महिन्यात पाणी पातळीची नोंद करण्यात येते. पावसाळ्यात जोरदार पाऊस झाल्याने भूगर्भातील पाणीपातळीत चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे दर वर्षी पाणी टंचाई भासणाऱ्या गावांच्या संख्येत घट झाली आहे. टंचाईची शक्यता कमी असली तरी नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची वरिष्ठ भूवैज्ञानिक प्रकाश शेलार यांनी गरज असल्याचे मत व्यक्त केले.

रेन वॉटर हार्वेस्टिंग आवश्‍यक

सहायक भूवैज्ञानिक डॉ. कैलास आहेर म्हणाले, की भूजल पातळी स्थिर राहण्यासाठी भूजलाचे पुनर्भरण करणे गरजेचे आहे. त्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पावसाचे पाणी वाहून जाऊ न देता ते योग्य पद्धतीने जमिनीत मुरेल याची व्यवस्था करणे. या पद्धतीमध्ये घर अथवा बिल्डिंगच्या छतावर साठणारे पाणी पाइपच्या मदतीने एखाद्या टाकीत अथवा हौदात साठवले जाते. त्यानंतर ते नैसर्गिक पद्धतीने शुद्ध करून योग्य पद्धतीने जमिनीत मुरवले जाते. ज्यामुळे जमिनीखालील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com