औरंगाबाद : हर्सूलमधून समांतर पाइपलाइन; सिडको एन-५ मधील टॅंकर बंद

विभागीय आयुक्तांनी घेतली झाडाझडती
Aurangabad water scarcity same pipeline from Hersul CIDCO N5 tank
Aurangabad water scarcity same pipeline from Hersul CIDCO N5 tanksakal

औरंगाबाद : शहरातील पाणी टंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी हर्सूल तलावातून १० एमएलडी पाणी उपसा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी नवी पाइपलाइन टाकली जाणार असून, या कामाला सोमवारपासून सुरुवात करण्यात आली. दरम्यान विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी कामाची पाहणी केली. दरम्यान श्री. केंद्रेकर यांनी सिडको एन-५ येथील पाण्याच्या टाकीची पाहणी करून झाडाझडती घेतली. त्यानंतर या टाकीवर भरले जाणारे टॅंकर बंदचे आदेश त्यांनी दिले.

हर्सुल तलावात यंदा मुबलक पाणी आहे. त्यामुळे दहा एमएलडी (दशलक्ष लीटर) पाणी वाढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जास्तीचे पाणी घेण्यासाठी तलाव ते जलशुद्धीकरण केंद्रा दरम्यान सातशे मीटर लांबीची व ३५० मिलिमीटर व्यासाची नवीन पाइपलाइन टाकली जाणार आहे. या कामाला सोमवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अजय सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात करण्यात आली. दरम्यान या कामाची पाहणी सुनील केंद्रेकर व आस्तिककुमार पांडेय यांनी केली.

यावेळी कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे व अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी सिडको एन- ५ येथील पाण्याच्या टाकीची पाहणी केली नेहमीप्रमाणे याठिकाणी टँकरची गर्दी होती. केंद्रेकर यांनी सर्व टँकर एमआयडीसीच्या पॉइंटवर नेण्याचे आदेश त्यांनी दिले. एमआयडीसीकडून आता तीन एमएलडी पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे एन-५ व एन-७ येथील टाकीवरून भरले जाणारे टॅंकर आता सिडको एन-१ येथील एमआयडीसीच्या पॉइंटवरून आता भरले जाणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com