औरंगाबाद : बेरोजगारीला कंटाळून युवकाची आत्महत्या

महिनाभरावर लग्न आल्याने रोजगाराअभावी होता तणावात
Crime
Crime sakal media
Updated on

औरंगाबाद : महिनाभरावर लग्न (wedding) आलेले असताना बेरोजगारीला(unemployment) कंटाळून २६ वर्षीय तरुणाने राहत्या घरात दोरीने गळफास घेत आत्महत्या(sucide) केली. हा प्रकार रविवारी (ता.१९) दुपारी चारदरम्यान उघडकीस आला. रामेश्वर हरिभाऊ धनगे (२६ वर्षे, रा. हर्सूल परिसर, मूळ रा. कन्नड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी रामेश्वर याच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने कन्नड तालुक्यातील एका महाविद्यालयातून पदवीपर्यंतचे(college degree) शिक्षण पूर्ण केले होते. मागील तीन ते चार वर्षापासून तो शहरात अभ्यास करत नोकरीच्या शोधात आला होता. दरम्यान, हर्सूल परिसरात किरायाची खोली करून तो राहत असे.

Crime
मुंबई : खासगी संस्थांकडून क्षयरोग चाचणी

खर्च भागवण्यासाठी मिळेल ते काम तो करत होता. मृत रामेश्वरचे लग्न ठरलेले होते. त्याचे लग्न २२ जानेवारी २०२२ रोजी होणार होते. मात्र नोकरी नसल्याने तो तणावात होता. या तणावातूनच रविवारी त्याने राहत्या खोलीत नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही बाब शेजारी राहणाऱ्याच्या लक्षात येताच रामेश्वर याला तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रामेश्वरला तपासून मृत घोषित केले. बेरोजगारीला कंटाळून रामेश्वरने आत्महत्या केली असावी असा अंदाज नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.या प्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास अंमलदार देविदास गाडेकर करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sandu Tukaram Karhale Freedom Fighter Death
Chhatrapati Sambhajinagar
Yellow date farming success story in Marathwada earning Rs 3 lakh per acre
Who can apply for BAMU direct admission 2026?
Marathi News Esakal
www.esakal.com