औरंगाबाद : ऑनलाइन फसवणूक, युवकाची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Online financial fraud

औरंगाबाद : ऑनलाइन फसवणूक, युवकाची आत्महत्या

कन्नड : एका कंपनीने ऑनलाइन आर्थिक फसवणूक केल्याने निराश झालेल्या एका हॉटेल चालक युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. मुकेश कचरू रोकडे (२१, रा. अंधानेर) असे मृताचे नाव आहे. अधिक माहिती अशी की, मुकेश रोकडे याने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यात त्याने म्हटले आहे की, एका बनावट कंपनीने पैसे दुप्पट करून देतो, असा फोन कॉल केला. त्याच्यावर भरवसा ठेवून एक लाख ७४ हजार रुपये ऑनलाइन सदरील कंपनीला पाठविले. नंतर फसवणूक झाल्यामुळे आत्महत्या करत असल्याचे या चिठ्ठीत नमूद केलेले आहे.

अंधानेर फाट्यावर मुकेशचे साईकृपा नावाचे हॉटेल आहे. या बाबत मुकेशने दुचाकीवर जाऊन औरंगाबाद येथे सायबर क्राईमला तक्रार दिली होती. सायंकाळी तो हॉटेलवर आला असता त्याने हॉटेल मागील रूममध्ये जाऊन गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच सरपंच अशोक दाबके, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय पांडे, साईनाथ काळे, दीपक वाघ, संदीप वाघ, नारायण शिरसाठ, योगेश सोनवणे, जयसिंग राठोड यांच्यासह पोलिस जमादार जे.पी. सोनवणे, डी. आर. खेडकर यांनीही घटनास्थळी धाव घेतली होती. सदरील युवक अविवाहित असून, त्याच्या पश्चात आई- वडील, एक भाऊ, बहीण असा परिवार आहे.

Web Title: Aurangabad Youth Committed Suicide Due To Online Financial Fraud

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..