esakal | पैठण तालुक्यातील शाळेला पाण्याचा वेढा, इमारतीला धोका
sakal

बोलून बातमी शोधा

ढोरकिन (ता.पैठण, जि.औरंगाबाद) येथील जोगेश्वरी वसाहतीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोर पाण्याचे डबके तयार झाले आहे.

पैठण तालुक्यातील शाळेला पाण्याचा वेढा, इमारतीला धोका

sakal_logo
By
विनोद शहाराव

ढोरकीन (जि.औरंगाबाद) : ढोरकिन (ता.पैठण) येथील जोगेश्वरी वसाहतीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोर पाण्याचे डबके तयार झाले आहे. त्यामुळे संपूर्ण शाळेच्या इमारतीला पाण्याने वेढले आहे. तेथे जाण्यासाठी जागा राहिली नाही. यामुळे शिक्षकांना विनाकारण त्रास होत आहे. मागील पाच-सहा दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नाल्या नसल्याने हे पाणी शाळेसमोरील जागेत साचते. यामुळे शाळेच्या इमारतीला धोका निर्माण होऊ शकतो व परिसरात दुर्गंधी पसरवुन डासांचा प्रादुर्भाव निर्माण होतो. येथील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तरी ग्रामपंचायत कार्यालयाने त्वरित लक्ष देऊन नाल्या तयार कराव्यात, अशी मागणी येथील गावकऱ्यांनी केली आहे. aurangabad zp school of dhorkin surrounded rain water glp88

हेही वाचा: दोघांचे प्रेम पाहून पोलिस भारावले! चार किलोमीटर पळवल्यानंतर...

पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्थित नाल्या नसल्याने हे पाणी शाळेसमोरील जागेत साचते. यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढतो व परिसरातील दुर्गंधी पसरते. आरोग्यावर परिणाम होतो.

- अशोक पठाडे, ग्रामस्थ

loading image