
छत्रपती संभाजीनगर : आधी अपर तहसील कार्यालय आणि आता जिल्हाधिकारी कार्यालय चर्चेत आले. पण, ते चांगल्या कामासाठी नव्हे; तर लाच घेण्याच्या घटनांमुळे! सद्यःस्थितीत महसूलचे लाचखोर सात अधिकारी-कर्मचारी निलंबित आहेत, तरी हा रोग थांबायला तयार नाही. काही दिवसांपूर्वी लाचप्रकरणी अपर तहसीलदारावर कारवाई करण्यासाठी अहवालाच्या प्रतीक्षेत आहोत, असे सांगणारा खुद्द निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर आता स्वतःच लाचेच्या सापळ्यात अडकला. शहरात एवढ्या मोठ्या पदावरील अधिकाऱ्याला लाचप्रकरणी ताब्यात घेण्याची पहिलीच कारवाई असल्याची चर्चा सुरू आहे.