‘ऑरिक’मध्ये ‘स्टार्टअप’ला मिळाव्यात सुविधा‘

मॅजिक’ने सरकारकडे केली मागणी : इनक्युबेशन सेंटर लवकर उभारा
Startup
StartupSakal

औरंगाबाद : सरकारने ऑरिक (शेंद्रा) येथे स्टार्टअपकरिता विशेष झोन आणि पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात, औरंगाबादसाठी घोषणा करण्यात आलेल्या जागतिक इनक्युबेशन सेंटरची लवकरात लवकर उभारणी करावी, तसेच आर ॲण्ड डी केंद्र, इनोव्हेशन पार्क विकसित करून ऑरिक-शेंद्रा येथे स्टार्टअपना चालना देण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात, अशी मागणी मॅजिक संस्थेने सरकारकडे केली आहे. यासंदर्भात सरकारच्या मंत्री आणि संबंधित अधिकारी यांच्याकडे ‘मॅजिक’तर्फे पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

Startup
जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शासकीय पूजन

औरंगाबादेत सध्या इथे २०० हून अधिक डीपीआयआयटी नोंदणीकृत स्टार्टअप्स आहेत. ‘वॉक टू वर्क’ या संकल्पनेसह भारतातील पहिले स्मार्ट औद्योगिक शहर असलेल्या ऑरिकमध्ये ७०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक आणि आगामी काळात तीन लाख लोकांना रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे. स्टार्टअप आणि इनोव्हेशन कल्चर मेट्रो शहरांच्या पलीकडे घेऊन औरंगाबादसारख्या टायर-२ शहरात नेण्याची हीच योग्य वेळ आहे. स्टार्ट अपने प्रकाशित केलेल्या ताज्या स्टार्टअप इकोसिस्टम रॅकिंग २०२१ अहवालानुसार, औरंगाबाद जगातील टॉप १००० शहरांमध्ये आहे. औरंगाबाद देशात ३६ व्या तर दक्षिण आशियामध्ये ४२ व्या क्रमांकावर आहे.

Startup
ST Worker : नागपूर वर्धमान नगर आगारातील २३ कर्मचारी बडतर्फ

या आहेत स्टार्टअपसमोरील अडचणी

  • भाड्याने घेतलेल्या जागेवरून चालणारे स्टार्टअप अनेक सरकारी प्रोत्साहन योजना आणि स्वतःची जमीन, परिसर नसल्यामुळे अनुदान गमावत आहेत.

  • स्टार्टअप मोठ्या रकमेचे भाडे देत आहेत आणि छोट्या जागेतून त्यांचे कार्य वाढवण्यात अडचणींचा सामना करत आहेत.

  • स्टार्ट अपसाठी वाळूज, चिकलठाणा आणि शेंद्रा येथे एमआयडीसीची जमीन उपलब्ध नाही

  • ऑरिक-शेंद्रा येथे औद्योगिक जमीन उपलब्ध आहे परंतु स्टार्टअप-एसएमई कंपनीसाठी युनिट आकार खूप मोठा आहे ज्याची त्यांना गरज नाही आणि किंमत देखील परवडत नाही.

  • सरकार स्टार्टअप कंपन्यांना सवलतीच्या दरासह ७५००-१५००० चौरस फूट प्लॉट आकारासह स्टार्टअपला ऑरिक-शेंद्रा येथील औद्योगिक जमीन वाटपाचा विचार करावा ज्यामुळे स्टार्टअप कंपन्यांना वाढीच्या पुढील टप्प्यावर जाण्यास मदत होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com