Road Accident in Ausa
esakal
पोदार शाळेसमोर कारने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला.
प्रसाद व गायत्री शिंदे या भावंडांचा जागीच मृत्यू झाला.
वाघोली गावावर या अपघाताने शोककळा पसरली.
औसा (जि. लातूर) : दुचाकीला कारने धडक दिल्यामुळे बहीण-भावाचा मृत्यू झाल्याची घटना शहरातून जाणाऱ्या औसा-तुळजापूर मार्गावरील पोदार शाळेसमोर मंगळवारी (ता. सात) घडली. महाविद्यालयात निघालेलेली वाघोली (ता. औसा) येथील ही भावंडे धडकेनंतर फेकली गेली (Tragic Road Accident in Ausa) आणि ट्रकच्या चाकाखाली सापडली. या दुर्दैवी घटनेने वाघोली गावावर शोककळा पसरली.