Chhatrapati Sambhajinagar: म्हणे, मी त्याची पत्नी नाही; त्या खोलीत प्रवेशही नव्हता; बाबा फर्जन याच्या बंगल्यावरील कारवाई प्रकरणात अटकेतील महिलेचा एकाच दिवसात यू-टर्न

Woman Changes Statement in Baba Farjan Case: छत्रपती संभाजीनगरातील बाबा फर्जन प्रकरणात अटक केलेल्या महिलेने तपासादरम्यान मोठा यू-टर्न घेत पत्नी असल्याचा दावा फेटाळला.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: जुन्या शहरातील दिवंगत डॉन बाबा फर्जन याच्या बंगल्यावरील कारवाईत पाच कोटींपेक्षा अधिक रोख रक्कम आणि मोठा शस्त्रसाठा सापडला होता. या प्रकरणात गुन्हा नोंद असलेल्या शीलाबाई बाबा फर्जन दोरडी ऊर्फ शीला साळवे हिने शस्त्रे आणि रोख रकमेबाबत आपल्याला काहीही माहिती नव्हती; शिवाय त्या खोलीत आपल्याला प्रवेशही नव्हता, असे तपासादरम्यान सांगितले. कारवाईदरम्यान आपण फर्जनची दुसरी पत्नी असल्याचे तिने सांगितले होते. पण आता आपण त्याची पत्नी नसल्याचा यू-टर्न तिने घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com