esakal | विद्यापीठाचा पुन्हा 'यु टर्न'; अखेर B.Com चे 700 विद्यार्थी उत्तीर्ण
sakal

बोलून बातमी शोधा

bamu

विद्यापीठाचा पुन्हा 'यु टर्न'; अखेर B.Com चे 700 विद्यार्थी उत्तीर्ण

sakal_logo
By
प्रमोद सरवळे

औरंगाबाद: कोरोनामुळे सध्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले असताना औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील गोंधळ पुन्हा समोर आला आहे. यापुर्वी विद्यापीठाने बी.कॉमच्या पहिल्या वर्षातील मुलांच्या निकालाचा घोळ केला होता. सुरवातीला विद्यापीठाने कॉम्प्युटर अॅप्लिकेशन विषयात जवळपास 700 विद्यार्थ्यांना नापास केलं होतं. त्यानंतर सातशे विद्यार्थ्यांना विद्यापीठाने पुन्हा पास केले होते आणि काही काळानंतर पुन्हा त्या विद्यार्थ्यांना नापास केले होते. आता पुन्हा एकदा या विद्यार्थ्यांना पास केले आहे. विद्यापीठाच्या असल्या कारभारमुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत असल्याचे पालकांनी सांगितले.

बी. कॉमच्या या विद्यार्थ्यांचा निकाल तब्बल चार वेळा लागला आहे. आता पुन्हा नापास केलं जाऊ नये, अशी प्रार्थनाच विद्यार्थ्यांना करावी लागत आहे. पण विद्यापीठाच्या कारभारामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. अखेर विद्यापीठाने बी. कॉमच्या पहिल्या वर्षातील 700 विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले आहे.

loading image