
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेच्या अर्थसंकल्पीय बैठकीसंदर्भात अधिसभा सदस्य डॉ. उमाकांत राठोड यांना पोलिसांनी समजपत्रबजावले आहे. ही नोटीस त्यांच्या पदाचा अवमान असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. या प्रकारामुळे विद्यापीठातील प्राध्यापक संघटनांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून, या कारवाईचा त्यांनी निषेध केला आहे.