esakal | पदवी परीक्षा: पहिल्या दिवशी ६६ हजार ४४१ जणांनी दिले ऑनलाईन पेपर
sakal

बोलून बातमी शोधा

BAMU News

पदवी परीक्षा: पहिल्या दिवशी ६६ हजार ४४१ जणांनी दिले ऑनलाईन पेपर

sakal_logo
By
संदीप लांडगे

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या (Babasaheb Ambedkar Marathwada University) पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑनलाईन (Online Exam) पध्दतीने सुरु झाल्या आहेत. पहिल्या दिवशी गुरुवारी (ता.२९) दोन्ही सत्रात मिळून ६६ हजार ४४१ जणांनी ऑनलाईन पेपर दिला, अशी माहिती (Aurangabad) परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.योगेश पाटील यांनी दिली. मोबाईल, लॅपटॉप अथवा संगणकावर पेपर देता येत आहेत. परीक्षा व मुल्यमापन मंडळाची नुकतीच बैठक होऊन परीक्षेचे नियोजन करण्यात आले. २३ ते २८ जुलै या काळात 'मॉक टेस्ट' (Mock Test) घेण्यात आली. तर १० ऑगस्ट पासून प्रथम वर्षाच्या परीक्षा होतील. (babasaheb ambedkar marathwada university's online examination starts aurangabad news glp88)

हेही वाचा: औरंगाबादच्या स्मार्ट सिटी बसची देशपातळीवर दखल

पदव्यूत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा १७ ऑगस्टपासून घेण्यात येतील. तर अभियांत्रिकी फार्मसी, विधीसह सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा २० ऑगस्टपासून सुरु होणार आहेत. पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरु होण्यापुर्वी २३ ते २८ जुलै दरम्यान ८७ हजार १०८ विद्यर्थ्यांनी मॉक टेस्ट दिली. तर पहिल्या दिवशी गुरुवारी (ता.२९) सकाळच्या सत्रात १० हजार ८०१ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा दिली. तर दुपारच्या सत्रात ५५ हजार ६४० विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पेपर दिला. सकाळच्या सत्रात १० ते १ तर दुपारी २ ते ५ या दरम्यान ऑनलाईन पेपर घेण्यात येत आहेत.

हेही वाचा: अंडे न वापरता बनवा चविष्ट असे 'चीजकेक', ही आहे रेसिपी

अनेक महाविद्यालयातील आयटी समन्वयक विद्यार्थ्यांना सहकार्य करत नसल्याच्या तक्रारी विद्यापीठाकडे प्राप्त झाल्या आहेत. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील एकही विद्यार्थी परिक्षेपासून वंचित राहणार नाही. याची काळजी संबंधित महाविद्यालयांने घ्यावयाची आहे. विद्यापीठ प्रशासन संबंधित महाविद्यालय व आयटी समन्वयकांना सहकार्य करण्याच्या सूचना कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी दिले आहेत. महाविद्यालयांनी दोन आयटी समन्यवक नेमूण परिक्षेच्या काळात त्यांना भ्रमणध्वनीवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी सूचना दयाव्यात, असेही निर्देश ही विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने दिले आहेत.

loading image
go to top