

Gas Cylinder Issue
esakal
बजाजनगर: बजाजनगर येथील कोलगेट चौकाजवळील बीएसएनएल कार्यालयासमोर एका रिक्षामध्ये सुरू असलेल्या पंक्चर दुकानात घरगुती सिलिंडरचा बेधडक वापर केला जात आहे. पण लक्ष कोण देणार?
वाळूज परिसरात घरगुती गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी नागरिकांना तासन् तास रांगेत उभे राहावे लागत आहे. बुकिंग करूनही वेळेवर सिलिंडर मिळत नसल्याने सामान्य जनतेचे अक्षरशः हाल होत आहेत. घरगुती गॅस काळाबाजार होत नाही, असे प्रशासन छातीठोकपणे सांगते. पथके थातूरमातूर कारवाया करीत आहेत.