

Chhatrapati Sambhajinagar
esakal
बजाजनगर: बजाजनगर, वाळूज महानगर आणि एमआयडीसी निवासी परिसरात सुरू असलेल्या पीएनजी गॅस पाइपलाइन कामांमुळे रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. कामानंतर रस्ते पूर्ववत न केल्याने नागरिकांना धुळीचा त्रास, तसेच अपघातांचा धोका वाढला आहे.