छत्रपती संभाजीनगर : बजाजनगर येथे गत महिन्यात एका उद्योजकाच्या घरावर दरोडा पडला. यात ३२ किलो चांदी आणि साडेपाच किलो सोने लंपास झाले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार बजाजनगर दरोडा प्रकरणात खोतकर, सुरेश गंगणे आणि खुशी हे नांदेड मार्गे तिरुपतीला गेले होते. .नांदेडला आरोपी रूपेश पत्रे याच्यामार्फत सराफा व्यावसायिक वैभव श्रीपाद मैड याला प्रत्येकी ९०० ग्रॅम वजनाची दोन चांदीची ताटे आणि काही दागिने दिले. परंतु, आरोपींनी केवळ चांदीच असल्याची कबुली दिली. दरम्यान, यामुळे चोरीतील सोने कुठे आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुसरीकडे दोन्ही आरोपींना न्यायालयाने गुरुवारी (ता. १२) एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली..गुन्हे शाखेच्या पथकाने मृत दरोडेखोर अमोल खोतकरच्या मित्राला रूपेश सुभाष पत्रे (वय २५) आणि सराफा व्यावसायिक मैड (वय २४, दोघेही रा. नांदेड) यांना बुधवारी (ता. दहा) नांदेड येथून अटक केली होती. रूपेशने खोतकरकडून घेतलेली चांदीची दोन ताटे सराफा मैड याला विक्री करून पैसे घेतले..Chh. Sambhaji Nagar News : सिडको एन-१ परिसरातील जलवाहिन्यांच्या खोदकामामुळे रस्त्यावर वाढलेली समस्यांची मालिका.खोतकरची बंगाली मैत्रीण खुशी हिनेही नांदेड येथे गेल्याचे सांगून पत्रे आणि मैड या दोघांना सोने आणि चांदी दिल्याचा पोलिसांना जबाब दिला. मात्र, पोलिसांनी अद्याप चांदीची ताटे हस्तगत केलेली नाहीत..खोतकरकडून सोने-चांदी घेऊन तेलंगणा, आंध्र प्रदेश येथे विक्री केल्याची शक्यता पोलिसांनी न्यायालयात व्यक्त केली. परराज्यात तपासासाठी जायचे असल्याने सरकारी वकील सुधीर बनसोडे यांनी आरोपींच्या सात दिवसांची पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने एक दिवसाची कोठडी मंजूर केली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.