
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागात पहिली गुणवत्ता यादी घोषित झाली. त्यानुसार प्रवेश विभागात सुरू झाले आहेत. पहिल्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना गुरुवारी (ता. सात) ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चितीसाठी मुदत देण्यात आली. पहिल्या यादीतील ८४३ पैकी ४८४ (५७ टक्के) विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले, अशी माहिती प्रवेश समितीचे अध्यक्ष तथा युनिकचे प्रमुख डॉ. प्रवीण यन्नावार यांनी दिली.